धामणी येथे 27 वर्षानंतर विध्यार्थी यांचा सस्नेह मेळावा


वाझोली/विजय सुतार यांचेकडून.....
            शाळेतील आठवणींना उजाळा देत धामणी ता पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. न्यू इंग्लिश स्कूल  माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९६० साली झाली. तेंव्हापासून 2022 पर्यंतच्या म्हणजेच १९९६ वर्षांतील  शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.

         1996 सालच्या सर्व माजी विध्यार्थी यांनी एकत्र येत  मेळावा आयोजित करण्यात आला होता. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

     शालेय जीवना नंतर नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी एकञ यावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.

      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  १९९६ सालचे मुख्याध्यापक श्री थोरात सर उपस्थित होते 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाचूपते बी आर  मॅडम यांनी करत आपल्या मनोगतात शाळेचा सर्व आढावा देत शाळेची भौगोलिक परिस्थिती बदलली पाहिजे या साठी माजी विध्यार्थी यांनी एकत्र आले पाहिजे. माजी विध्यार्थी विनायक पुजारी व अंकुश सावंत व सर्व माजी विध्यार्थी यांनी एकत्र येत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप कष्ट घेत कार्यक्रम संपन्न करण्यात मोलाची कामगिरी बजावली तसेच शाळेला रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख रक्कम देण्यात आली.

          माजी शिक्षक व मुख्याध्यापक श्री थोरात सर यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय बापुजी साळुंखे यांचे उल्लेख करत ज्ञानाचा प्रसार हा विध्यार्थी यांच्या सोबत घरापर्यंत गेला पाहिजे तरच  स्पर्धेच्या युगात हा विद्यार्थी टिकला जाईल या सोबत श्री देसाई सर व येडगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी माजी शिक्षक देसाई सर,देशमुख सर,आवळकर सर,कांबळे सर,आत्तार सर,येडगे सर,देसाई सर,जाधव सर,मोरे सर,जानुगडे मॅडम,पाटील मॅडम उपस्थित होते.गावच्या सरपंच आशाताई नेर्लेकर ,सुंदर भाऊ पुजारी,शामराव पुजारी सर आनंदा नायकवडी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महाडिक टी एस सर तसेच काळे एस आर सर व कार्यक्रमाचे आभार श्री ढगाले पी आर सर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न