श्री. विक्रमसिंह देसाई यांची रयत बँकेवर संचालक म्हणून निवड

काळगाव /महादेव थोरात यांचेकडून

राज्यातील 16 जिल्ह्यात श्री. विक्रमसिंह देसाई यांची रयत बँकेवर संचालक म्हणून निवड असणारी पगारदार सेवकांची राज्यातील दोन नंबरची बँक दि. रयत सेवक को. ऑफ. बँक लि, सातारा या बँकेची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधी करिता निवडणूक पार पडली या मध्ये बँकेवरती रयत सेवक मित्र मंडळ पॅनलची सत्ता आली असून सर्वसाधारण गटातून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, काळगाव ता. पाटण या शाखेचे कर्मचारी श्री. विक्रमसिंह तानाजीराव देसाई हे प्रचंड मतांनी संचालक म्हणून निवडून आलेले आहेत.

         बँकेची सभासद संख्या 10500 च्या वरती असून बँकेच्या 21 शाखामधून सुमारे 2200 कोटींचा व्यवसाय आहे.  रयत बँक ही महाराष्ट्रातील एक नामांकित बँक म्हणून ओळखली जाते. बँकेच्या निवडणुकीमध्ये कराड कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रावरती रयत सेवक मित्र मंडळ पॅनलच्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी सुमारे 50 मतांची आघाडी घेतलेली होती.

      श्री. विक्रमसिंह देसाई यांच्या विजयानंतर अनेक मान्यवरांनी, आजी-माझी रयत सेवकांनी, पापर्डे गावातील ग्रामस्थांनी त्यांना समक्ष भेटत व प्रसार माध्यमाद्वारे त्यांचे अभिनंदन  करून शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न