यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे वितरण


 

मुंबई/प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन  व जया अलीमचंदानी फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2022 ॲड माजी आमदार माधवी नाईक यांच्या हस्ते विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक  होते. या कार्यक्रमास भरत पाटील, चंद्रकांत चाळके, सुनील मस्कर, प्रकाश बोत्रे, अंकुश सावंत, हेमंत ताईगडे , सचिन पवार ,सुवर्णा पाटील, विद्या मोरे, विदयाराणी सकटे उपस्थित होते.

फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत म्हणाले की, सहकार, शिक्षण,  सांस्कृतिक, पत्रकार, शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, समाजसेवा या विभागातून विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रतिवर्षी 2018 पासून देण्यात येत आहे, या याआधी गणेश नाईक, प्रवीण दरेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. पुरस्काराच्या माध्यमातून लोकांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणे या हेतूने या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

ॲड. माधवी नाईक म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात तसेच राजकारणामधील एक सुसंस्कृत नेता म्हणून महाराष्ट्रापुढे आदर्श आहे अशा आदर्श नेत्यांच्या नावाने पुरस्कार देऊन लोकांनी लोकांना सन्मानित करणे व त्यांना प्रोत्साहन देणे ही फाउंडेशनच्या वतीने काम केले जाते हा कौतुकास्पद उपक्रम आहे .हा पुरस्कार समारंभ प्रतीक वर्षी करून नवोदित कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात यावा त्यातून त्यांना प्रेरणा मिळवून लोक कार्य आधी सक्षमपणे करण्यासाठी त्यांना एक ऊर्जा मिळेल. समाजामध्ये अशा प्रकारचे उपक्रम करून लोकांना प्रोत्साहित केल्यामुळे अधिकाधिक लोक यामध्ये काम करण्यासाठी तयार होतील.

सहकार विभाग : किसन सावंत, लक्ष्मण घराळ 

वैद्यकीय विभाग : डॉ. अनुजा कुनरे, डॉ.सायली गोखले, सुभाष जाधव

सामाजिक विभाग : सायली शिंदे, उज्ज्वला ढोले,

त्रिमूर्ती फाउंडेशन, आधारपर्व फाउंडेशन, साई मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, आश्ररमुख फाउंडेशन, चैत्राली वांकर, सहज सेवा सामाजिक संस्था, स्वाती ढाणे, सागर ढाणे, साविता मोढवे, दिनकर रेठरेकर, गणेश शिरसट, साधना दुबे, सर्प मित्र धीरज तामाहणे, यशश्री जोशी, पुजा काळे, रणधीर येळवे, संध्या सांळुखे, लायन हार्ट ग्रुप, विकी वाडे, चित्रा मराठे

संगीत विभागातून

आनंद गोंधळी ,सुनील सावंत

शिक्षण विभागातून

प्राचार्य प्रतापराव महाडिक, विकास पाटील

उद्योजक विभाग, अक्षय सावंत, गणेश वायकर, अनिकेत बोरगे

प्रास्ताविक संजय सावंत यांनी केले आभार जया अलीमचंदानी यांनी केले व सुत्रसंचालन कविता कचरे यांनी केले

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न