Posts

डाकेवाडी येथे गुरुचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पारायणाचे यंदा 33 वे वर्ष आहे. वै.ह.भ.प.यशवंत महाराज डाकेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नामदेव महाराज डाकेवाडीकर हे व्यासपीठचालक चालक आहेत. विनापूजन यशवंत मारुती डाकवे, उद्घाटन हरी बळी डाकवे, तुकाराम गोविंद डाकवे, मुर्तीप्रतिष्ठापना अशोक रामचंद्र डाकवे, ग्रंथपूजन बाळू बाबू डाकवे यांच्या हस्ते होणार आहे.  रविवार दि.30 नोव्हेंबर, 2025 रोजी ह.भ.प.जयश्रीताई महाराज धाईटी, सोमवार दि. 1 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज मत्रे, मंगळवार दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर, बुधवार दि.3 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.धनश्रीताई महाराज बोर्गे, गुरुवार दि. 4 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.अचर्नाताई महाराज सुर्यवंषी यांची कीर्तने होणार आहेत.  तर शुक्रवार दि.5 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर यांचे काल्याचे किर्तन तसेच गुरुवार दि.4 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ तर सायंकाळ...

स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रक्कम पुरग्रस्त विद्यार्थ्याला

Image
  तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्पंदन जीवन गौरव पुरस्काराची रु.5,000 ही रक्कम लातूर जिल्हयातील अवधूत देवानंद माळी या पुरग्रस्त बाधित विद्यार्थ्याला ऑनलाईन पध्दतीने पाठवली आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीवर 7 ऑक्टोंबर, 2025 रोजी लातूर जिल्हयातील एकुरगा या छोटयाशा गावातील अवधूत माळी याची कहाणी मांडली होती. यातून त्याला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत स्पंदनने खारीचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना प्रतिवर्षी स्पंदन जीवन गौरव देवून गौरवण्यात येते. या पुरस्कारांचे स्वरुप रोख रक्कम रु.5,000/-, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक आहे.  यापूर्वी स्पंदन जीवन गौरव पुरस्कार नीलकंठ खाडीलकर (पत्रकारिता), पद्मश्री डाॅ.विजय शहा (वैद्...

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रतीक मगरे यांची निवड

Image
  कराड/वार्ताहर रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष ॲड.धम्मराज नवनाथ साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे प्रतीक मगरे यांची रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली प्रतीक मगरे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय आहे त्यांना आवड आहे विद्यार्थ्यांना मदत करणे आणि उपक्रम राबवणे आणि त्या आवडीचा परिवर्तन कुठे ना कुठेतरी योग्य प्लॅटफॉर्म वरती झाला पाहिजे या अनुषंगाने रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी दखल घेऊन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण व  रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.विठ्ठलराव येळवे यांच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात आली व रयत चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पाटण येथे आजी/माजी सैनिक तालुका स्तरीय बैठक संपन्न

Image
  तळमावले/वार्ताहर पाटण प्रांत अधिकारी श्री सोपान टोम्पे व तहसीलदार श्री. अनंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपसंचालक सैनिक कल्याण विभाग पुणे ले कर्नल सतेश हंगे यांच्या उपस्थितीत सैनिक व कुटुंबिय यांची तालुकास्तरीय  बैठक संपन्न झाली. महसूल, ग्रामविकास, वन , पोलिस, भूमी अभिलेख, सर्व विभागातील समस्या अडचणी लेखी अर्ज घेऊन कारवाई करण्यात आली प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले व त्यांनी सांगितले की कार्यालयात सैनिक व कुटुंबिय यांच्या समस्या संदर्भात सैनिकांसाठी समस्या संदर्भात लेखी अर्ज घेऊन आपण केव्हाही ऑफिस वेळेत भेटू शकता व आपले अर्ज जमा करु शकता ते स्वीकारले जातील व  मदत केली जाईल तालुका प्रशासन सैनिक व कुटुंबिय यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासित केले. या प्रसंगी या बैठकी साठी श्री प्रशांत कदम सदस्य जिल्हा संरक्षण समिती व अमृतवीर जवान अभियान राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी सैनिक व कुटुंबिय यांना  जिल्हा स्तरावर संरक्षण समिती बद्दल माहिती देण्यात आ...

पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Image
कराड ( वार्ताहर) कराड येथील News Bharat 24 च्या ब्युरो चीफ आणि Daily Latest News च्या प्रतिनिधी पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती येथे पार पडलेल्या संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे, सातारा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे ,सातारा जिल्ह्याचे माजी उपजिल्हाध्यक्ष नितीन मोरे उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार विद्या मोरे यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवासजी पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदय...

धामणीमध्ये सेवानिवृत्त सैनिकांची जंगी मिरवणूक व स्वागत

Image
धामणी/वार्ताहर            धामणी, ता - पाटण , जि- सातारा येथील सेवानिवृत नायक सुभेदार श्री . रविंद्र शामराव लोकरे यांचा सेवानिवृत्ती सोहळा जंगी मिरवणुक काढून मोठया आनंदात , उत्साहात , दिमाखात साजरा करण्यात आला .         धामणी गावचे सुपुत्र श्री रविंद्र शामराव लोकरे हे भारतीय सैन्य दलातून देशाची २४ वर्षाची प्रदीर्घ पुर्ण सेवा करून २४ ऑक्टोंबर ला धामणी गावामध्ये आले . २१ सप्टेंबर २००१ ला सैन्यात भरती झालेपासुन आपल्या सेवाकाळात भारतातील सीमारेषा सुरक्षित ठेवण्याचा मोठया जोखमीचे कर्तव्य यशस्वीरित्या पुर्ण केले .युनिट २१६ मध्यम तोफखाना मधून सुरुवातीचे तोफखाना गनचे १० महिन्याने  ट्रेनिंग हैद्राबाद , नाशिक येथे घेतले .  त्यानंतर अरुणाचल प्रदेश टेंगा तवांग चायना बॉर्डर , कुपवाडा, पठ्ठण बारामुल्ला जम्मू काश्मीर , पंजाब पटियाला , कारगिल द्रास सेक्टर , भुसावळ महाराष्ट्र , दुग्रुमुल्ला जम्मु काश्मीर , हरितकोट पंजाब , नाशिक याठिकाणी भारतभूमीची २४ वर्षाची प्रदिर्घ सेवा केली .देश हाक मारेल तिथं धावून जाऊन देशातील कानाकोपऱ्यात प्रतिकुल परिस्थित...

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Image
कराड/वार्ताहर          मराठा साम्राज्याची राजधानी व सैनिकांचा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवलेला शूरवीरांचा जिल्हा म्हणजे सातारा. त्यातीलच एक 36 मराठा माध्यमिक धुवाधार तोफखान्याचा राजधानी ग्रुप सातारा आहे. तोफखान्याच्या माध्यमातून स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. त्याला प्रत्येक वर्षी प्रचंड प्रतिसाद,  वाढता उत्साह आणि त्यातूनच सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. या मेळाव्यामध्ये आजी-माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या मित्रमंडळींना, पै पाहुण्यांना तसेच नातलगांना आमंत्रित करून खऱ्या अर्थाने सैनिकांप्रती देशाप्रती जनजागृती करण्याचे अलौकिक असे कार्य राजधानी ग्रुप सातारा तर्फे केले जात आहे. स्नेहसंमेलनासाठी आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पै पाहुण्यांना, नातलगांना, सैनिकी जीवनातील सैनिकांप्रती एक- दुसऱ्याच्या प्रति असलेला आदर-सत्कार, मैत्री आणि राष्ट्र तसेच देशावर असलेले देशप्रेम पाहून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना खरंच सातारा जिल्ह्याची दिवसेंदिवस घटती सैन्य संख्या, याला वाचा फोडणारी परंपरा शूरवीरांचा जिल्हा किंवा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपणही भारतीय...