Posts

उपक्रमशील कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सत्कार समारंभ

Image
पाचवड/वार्ताहर                  महात्मा गांधी विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक श्री.बाळासाहेब कचरे हे रयत शिक्षण संस्थेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृ्त्त झाले.या कार्यक्रमास रयतचे माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार साहेब अध्यक्षस्‍थानी होते. तर श्री.रविंद खंदारे साहेबउपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रदीप कुंभार, सुवर्ण पदक विजेते, पॅरा रनर मुंबई हे प्रमुख अतिथी होते. विद्यार्थी कलेच्या चळवळीसाठी व रयतेच्या विविध उपक्रमात  सरांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे.असे मत श्री.बीड.एन.पवार यांनी व्यक्त केले.सेवानिवृत्ती निमित्त कचरे सरांनी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधूना संपूर्ण पोशाख देत अध्यक्ष पवार साहेबांच्या हस्ते सन्मानीत केले.या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी पत्रकार व संपादक राहूल ताटे ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, प्रा.रविंद्र खोत यांची विशेष मनोगते झाली.                असंख्य नातेवाईक, मान्यवर, रयत व रयत बाहेरील कलाशिक्...

माणुसकीचा ‘दीपस्तंभ’ -प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर)

Image
आदरणीय प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर) आणि माझी प्रथम भेट कधी झाली ते आता नीटसे आठवत नाही. साधारणपणे सन 2006 च्या सुमारास मी सरांच्या वाणी आणि लेखणीच्या प्रेमात पडलो. सरांच्या आणि माझ्या जवळ येण्याचा एक धागा म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा). आबांची एकंदरीत वाटचाल मला प्रेरणादायी वाटली म्हणून मी त्यांचे ‘आबा’ या शब्दातून आणि फक्त ठिपक्यातून चित्र रेखाटले होते. ती चित्रे आदरणीय सरांनी आबांना फॅक्स व्दारे मंत्रालयात पाठवली होती. त्यावेळी आबांनी ‘मला या मुलाला भेटायला आवडेल’ असा शब्द दिला. सरांचे आणि माझे नाते जुळले ते यामुळेच. मला चित्रकला या छंदाबरोबर ‘पत्रमैत्री’चा छंद आहे. मी सरांना अनेक पत्रे पाठवली. त्यावर प्रतिक्रिया देताना सर फोन करायचे त्यावेळी माझी बोलताना कसरत व्हायची. कारण सरांचे शाब्दीक सौंदर्याने, उपमांनी नटलेेले शब्द मला मंत्रमुग्ध करायचे. 28 जुलै, 2006 रोजी सरांनी पाठवलेले पत्र माझ्या ‘पत्रमैत्री’ छंदातील अनमोल ठेवा आहे.  सन 2007 रोजीच्या आमच्या ‘शिवसमर्थ’ या दिवाळी अंकातील आदरणीय सरांनी लिहलेली ‘कृतज्ञता’ ही कथा इ.6 वीच्या बालभारतीच्या पाठयप...

ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

Image
दौलतनगरदि .26:-  ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राज्यातील महायुतीचे शासन प्रयत्नशील असून सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या योजना राबविण्याचे काम आपण पालकमंत्री म्हणून केले. त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करत या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामांसाठी निधीची तरतूद करुन या कामांना प्राथमिकता दिली. सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शिक्षण,आरोग्य व पाणी पुरवठा या तीन गोष्टींना प्राधान्य दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा होत असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.             तळमावले,ता.पाटण येथे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र...

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

Image
पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व सतत अतिवृष्टी  होणारा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ७५०  विद्यार्थ्यांना उर्मी सामाजिक संस्था पुणे व हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.,विवो पुणे यांचेवतीने रेनकोटचे वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटण मुले येथे करणेत आले..त्याप्रसंगी हिसोवा संस्थेचे व्यवस्थापक प्रतिनिधी सौम्या बक्षी, रोहीत वाघळे, किरण जावळे, सुधीर अडमुठे, विवेक साळुंखे, उर्मी संस्थेचे किशोर पेडणेकर, राहूल चुनीदास, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख संजय आटाळे, राजेंद्र पाटील, नारायण बागल, सुनिता नांगरे, दिलीप शिंदे, संतोष होळ तसेच विवोचे वितरक शंकर हराळे व रणजीत सावंत हे उपस्थित होते.. पाटण तालुक्यातील अतिवृष्टीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाता-येता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, पावसापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड न पडता अध्ययन प्रकिया सुलभ व्हावी,यासाठी संस्थेकडून देणेत येणारे रेनकोट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आनंद...

डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने प्रदीप शेलार यांचा सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर                पाटण तालुक्यातील कोयनानगर (सोनारवाडी) येथील युवा शेतकरी प्रदीप कोंडीबा शेलार यांचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय शेती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पाटण तालुक्यात सेंद्रीय शेतीचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले युवा शेतकरी ठरले आहेत. पुरस्कार वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार, आत्माचे अजय शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.                सेंद्रीय शेती, फुले, फळे व दुग्धक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पुरस्कारांचे वितरण कृषी दिनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले.                 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध पुरस्का...

हुश्श...झाली....एकदा काळगांव परिसरात धुळवाफेवरील पेरणीला सुरुवात

Image
  तळमावले/वार्ताहर मे महिन्यातील 20 तारखेपासून अगदी काल परवापर्यंत अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून टाकली. त्यामुळे बळीराजाला मे महिन्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला अजिबात वेळ मिळाला नाही. दोन तीन दिवसापूर्वी पाऊस उघडल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. रविवार दि.8 जून पासून मृग नक्षत्र सुरु झाल्याने शेतकरी वर्ग चिंतीत होता. परंतू पावसाने उघडीप दिल्याने काळगांव विभागात सध्या धुळवाफेवरील पेरणीची लगबग सुरु असलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतशिवार अगदी माणसांनी गजबजून गेला आहे. शेतामध्ये खते टाकणे, शेतीतील पालापाचोळा गोळा करणे,  बांध धरणे, घरात लाकडे भरणे, वैरण घरात भरणे इ. सर्व कामे यावेळी रखडली होती. ती हातघाईवर आली आहे. एरवी उन्हाळयातच धूळवाफेवरील पेरणी केली जाते. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, मका इ.पीके घेतली जातात. परंतू यावेळी धूळवाफेवरील पेरणी झाली नाही. दोन दिवसापूर्वी या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरु केली आहेत. नांगर, कुळव, पाटे, कुरी, बांडगे इ. पारंपारिक शेती औजारांच्या सहाय्याने लोक शेती करत आहेत. क्वचितच रोटर, ...

शिबेवाडीत साकारलेय पाटण तालुक्यातील सर्वात मोठे शेततळे

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील शिबेवाडी (वरची) गुढे येथील माळरानावर एक अवाढव्य शेततळे साकारले आहे. डोंगरावरील सुमारे 25 लोकांनी एकत्र येवून आई काळंबा देवी ॲग्रो  या कंपनीची निर्मिती केली आहे. त्यांनी अथक परिश्रमातून हे शेततळे तयार केले आहे. या शेततळयाचा आकार 80 बाय 65 मीटर आहे. त्याचा शुभारंभ दि. 6 मार्च, 2025 रोजी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते झाला. सुमारे 3 महीने दिवस काम सुरु होते. 100 कामगार यामध्ये काम करत होते. या शेततळयामध्ये 2.5 कोटी लिटर पाण्याचा संचय होणार असून त्यामुळे 35 एकर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. हे शेततळे ग्रॅव्हीटीच्या उतारावरील पाण्याने भरणार आहे. सदर शेततळे हे पाटण तालुक्यातील सर्वात मोठे असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. शिबेवाडी ते कोळपे माळ-मारुती मंदीर या ठिकाणचा पाणंद रस्त्याला निधी राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिल्यामुळे शेततळयाचे काम करण्यास गती मिळाली आहे.  या शेततळयातील पाण्याचे पुजन नुकतेच जागतिक पर्यावरण दिन आणि गंगादशहरा समाप्ती दिनादिवशी मोठया उत्साहात झाले. ...