Posts

शासनाच्या शेतीमित्र पुरस्काराबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Image
  तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटण तालुक्याचा अभिमान ठरलेले डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम तसेच सोशल मिडीयाव्दारे डाॅ.डाकवे यांच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले आहे. तळमावले (ता.पाटण) येथे शिवसमर्थ परिवाराच्यावतीने शाल, बुके व श्रीफळ देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार शिवसमर्थ समुहाचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे, सीईओ हेमंत तुपे, सुनील ढेंबरे, व्यवस्थापक नितीन पाटील, देवबा वायचळ व शिवसमर्थ मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आधार फौंडेशनचे रामभाऊ कोळेकर यांनी फ्रेम देवून डाॅ.संदीप डाकवे यांचा सत्कार आई गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, पायल कोळेकर, रोहित पवार, अक्षता निवडूंगे, पुजा निकम, स्पंदन डाकवे, सांची डाकवे, साईशा कोळेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत केला.  वरची शिबेवाडी...

राजेश नवलू बोडके यांचे निधन

Image
मुंबई/वार्ताहर जाईचीवाडी (ता.पाटण) येथील राजेष नवलू बोडके यांचे शुक्रवार दि.11 ऑक्टोंबर, 2024 रोजी वयाच्या अवघ्या 23 वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कामानिमित्त ते कामोठे या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ वहिनी, बहीण दाजी असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि. 13 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता जाईचीवाडी, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान

Image
फलटण/स्पंदन एक्स्प्रेस वृत्तसेवा  महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार सचिन जाधव सासकल कृषि सहाय्यक  फलटण जिल्हा सातारा यांचा सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे व मा प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, मा आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से मा कैलास मोते फलोत्पादन  संचालक महाराष्ट्र राज्य, तसेच संचालक, विनयकुमार आवटे विकास पाटील, सुनील बोरकर,आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब  वरळी मुंबई गौरव करण्यात आला. सातारा जिल्यातील पाहिले कृषि सेवा रत्न मिळवण्याचा मान मिळवला आहे.  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून      कृषि विभागा कडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराबद्दल  उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा आधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे,उपविभागीय कृषि अधिकारी फलटण सुहास रनसिंग, तालुका कृषि...

शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा : अँड.प्रकाश पाटील

Image
  राज्यात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची संख्या खूप व असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना करून देण्याची आज गरज आहे. त्यामुळे संघाने वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेल्या आणि रास्त असलेल्या मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला काम करताना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मध्यस्थ म्हणून उपयोग करून घेता येईल.असे शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍड प्रकाश पाटील यांनी राहुरी विद्यापीठाजवलील हिंदुस्थान ऍग्रो च्या प्रांगणात संघाच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना मांडले.कार्यक्रमासाठी मा एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार होते.परंतु त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेमुळे त्यांचा दौरा रद्द झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते.  शासनाच्या विविध समित्या, शासकीय धोरण व त्या संबंधित समित्या वर राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकाऱ्यांना प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्याची आज गरज असून हेच पुरस्कार प्राप्त शेतकरी शासनाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवू शकतील, त्यासाठी त्यांच्या मान्य करण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली.यासोबतच ...

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

Image
तळमावले/वार्ताहर             पाटण तालुक्यातील एका छोट्याशा खळे शिद्रुकवाडी गावात अल्बम सोंग ची निर्मिती करण्यात आली, हे गाणं कॉलेजच्या जीवनावर आधारित रोमँटिक लव्ह सोंग आहे यामध्ये तीन जोड्या लीड रोल मध्ये असून स्टोरी कव्हर करण्यासाठी इतर कलाकारांना संधी दिली आहे,या गाण्यात मोठमोठ्या कलाकारांना संधी देताना नवीन कलाकारांना स्व;ता चे व्यासपीठ निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे "स्वर प्रोडक्शन" आणि "ओम तेजा प्रोडक्शन" यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती होत असून, गाण्याचे निर्माते, आशिष सावंत, दिग्दर्शक महादेव शिरोळकर आहेत,                   गीतकार शिवाजी सावंत, विकास खराते,तर चाल शरद पवार यांची आहे,गाण्यातील लीड कलाकार म्हणून प्रशांत बोदगिरे, गौरी सावंत, आनंदा चव्हाण, प्रचिती चांदणे,हृशल जाधव, अनुष्का गुरव असुन इतर नविन कलावंतांना संधी उपलब्ध करून दिली आहे, कला दिग्दर्शक,विनय भगत, DOP अमोल यादव मेकअप सरिता येवले,                गायिका प्रां...

राजाराम डाकवे (तात्या) यांचे व्दितीय पुण्यस्मरण 18 सप्टेंबर रोजी

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि.18 सप्टेंबर, 2024 रोजी प्रतिमा पुजन, ग्रंथालयाचे लोकार्पण, पुष्पवृष्टी, महाप्रसाद, इ.कार्यक्रमांचे चे आयोजन मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी केले आहे. राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा असे अभिनव उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.  व्दितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, डाॅ.संदीप डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

गावोगावी ग्रंथालय चळवळ निर्माण होणे आवश्यक : प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे

Image
कराड (प्रतिनिधी) : ग्रंथालय हे ज्ञान व माहितीचे वहन करणारा महत्त्वपूर्ण स्रोत आहे.सामाजिक जागृतीमध्ये ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण असून गावोगावी ग्रंथालय चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे यांनी केले.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते.     प्राचार्य घाटगे पुढे म्हणाले की, स्वामी रंगनाथन यांच्या मते ग्रंथ हे वाचण्यासाठी असतात, प्रत्येक वाचकांसाठी पुस्तके असतात. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो आणि प्रत्येक ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. तसेच ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे. ही ग्रंथालयासाठी सर्वसमावेशक पंचसूत्री तयार केली आणि ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला. तसेच ग्रंथालय चळवळी मधून अनेक प्रतिभावंत साहित्यिक निर्माण झालेले असून माहिती...