Posts

येळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर      पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे रामनवमी, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व मंदिराचा 10 वा वर्धापन दिन सोहळयाचे आयोजन केले आहे. सदर पारायण सोहळयाचे हे 20 वे वर्ष आहे. श्री सद्गुरु योगीराज हरिहर महाराज, श्री सद्गुरु रामानंद महाराज, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी यांच्या प्रेरणेने ह.भ.प.जितेंद्र महाराज आवारे, ह.भ.प.बाबुराव महाराज सलते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.      पारायण सोहळयाचे कलश पुजन अॅड.विठ्ठलराव येळवे, विनापुजन बाबुराव मस्कर, ग्रंथ पुजन बाजीराव येळवे, ध्वज पुजन सुरेश येळवे तर मुर्तीपुजन अमित येळवे यांच्या हस्ते होणार आहे. मृदंगाचार्य ह.भ.प. जितेंद्र महाराज आवारे, नारायण महाराज सलते, हरिओम आवारे व श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, गायनाचार्य संगीत विशारद ह.भ.प.बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, जितेंद्र महाराज आवरे, दादा महाराज खडके, हुनमान महाराज खडके, तर काकडा यासाठी बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, पांडूरंग महाराज सलते व सलतेवाडी म...

तेटमेवाडीमध्ये आगीत घर जळून खाक

Image
तळमावले/डाॅ.संदीप डाकवे                     पाटण तालुक्यातील काळगाव पासून 3 ते 4 किमी अंतरावर असलेल्या तेटमेवाडी या वाडीमध्ये यशवंत महादेव तेटमे (वय 75 वर्षे) यांच्या घराला मंगळवार दि.28 मार्च, 2023 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. यशवंत तेटमे हे आपली पत्नी सौ.तारुबाई तेटमे गावी राहतात त्यांची दोन मुले आणि सुना मुंबईला राहतात. सदर घटनेचा अहवाल ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे हवालदार शेळके, तसेच काळगांवचे तलाठी वैभव शितोळे, कदम आण्णा यांनी केला. यावेळी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, यशवंत तेटमे, सौ.पारुबाई तेटमे, पोलीस पाटील पांडूरंग तेटमे व अन्य उपस्थित होते. या आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्याची पोती, रोख रक्कम, दाग दागिने व इतर मालमत्ता असा सुमारे 15 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.                यशवंत तेटमे यांचे घर एका बाजूला आहे. घराच्या जवळ असलेली गवताची गंज देखील जळून खाक झाली आहे. य...

शिवरायांना वंदन करुन रोहित साळुंखे ने बांधली लग्नगाठ

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता.कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या लग्नसोहळयात मंगलाष्टकापूर्वी रोहित आणि ऋतुजा या नववधु-वरांनी छत्रपती महाराजांच्या पुतळयाचे विधीवत पूजन करत महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. शिवरायांच्या विचारांचा दरवळ सर्वदूर पोहोचवत दोघांनी लग्नगाठ बांधली. स्टेजवर वधूवरांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यामुळेे लग्नात उपस्थित असलेल्या प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून गेली. रोहितला दुर्गभ्रमंती करण्याची आवड आहे. अनेक किल्ले त्यांने पादाक्रांत केले आहेत. शिवशंभू ट्रेकर्स च्या माध्यमातून तो शिवजयंती किंवा अन्य कार्यक्रमात हिरीहिरीने सहभागी असतो. विशेष म्हणजे लग्नामध्ये रोहित आणि ऋतुजा या दोघांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. या विवाहानिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी व मान्यवरांना निमंत्रण देण्यासाठी परंपरेनुसार आकर्षक पत्रिका छापण्यात आल्या होत्या. या पत्रिकेला शिवकालीन लखोटयाचा लुक दिला होता. स्टेज आणि मंडपात...

वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचे देहावसान

Image
                     श्री श्री 1008 प.पु.महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंदगिरी महाराज (श्रीपंचदशनाम जुना भैरव आखाडा) श्री क्षेत्र वैराटगड यांचे शुक्रवार दि. 3 मार्च, 2023 रोजी सायंकाळी 7.25 वाजता देहावसान झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये घालवले. अध्यात्माबरोबरच ‘‘मानवसेवा हीच ईश्वर सेवा’’ हे ब्रीद घेऊन जनसेवेचा नंदादीप त्यांनी अखंड तेवत ठेवला.                     वैराटवासी आबानंदगिरी महाराज यांचा जन्म 15 मार्च, 1953 रोजी झाला. वडील सखाराम बळवंत पांचाळ व आई लक्ष्मीबाई यांच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. सातारा जिल्ह्यातील वाझेगाव ता.फलटण हे आबानंदगिरी महाराजांचे मुळ गाव. 19 मे 1975 पासुन ते प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांचे सान्निध्यात आले. गगनगड येथे ते गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि त्यांचे पाईक झाले. सन 1980 साली प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपाशिर्वादाने बिंबातुन प्रतिबिंब शोधण्यासाठी स्वामी आबानंद कृष्णेच्या जवळ असलेल्या वैराटगडावर ...

दौलतनगर येथे शनिवार दि. 25 फेब्रुवारीला सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेकरीता कार्यशाळेचे आयोजन

Image
दौलतनगर दि .23 :-                      पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पध्दतीने करण्याबरोबर राज्य शासनाच्या विविध योजना ह्या ग्रामस्तराव प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दि. 25 फेब्रुवारी  2023 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केली आहे. या एकदिवशीय कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे.यावेळी सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.                     या एकदिवशीय कार्यशाळेच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये...

मोरया ग्रुप व हनुमान मंडळाने शिवजयंती जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करून आदर्श निर्माण केला - हिंदुराव पाटील

Image
ढेबेवाडी/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा         मोरया ग्रुप आणि हनुमान मंडळाने शिवजयंती जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करून खर्या अर्थाने शिवरायांचे विचार जपले आहेत आजच्या काळात शिव विचारांची,त्यांच्या कार्याची पारायणे होणे गरजेची आहेत आज आपल्या मंडळाने गावातील सर्वांना बरोबर घेवून लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनी मिळून सकाळ पासून  उत्साहाने शिवजयंती साजरी केली ही उल्लेखनीय बाब आहे असे प्रतिपादन पाटण तालुका काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांनी केले.             Mandrulkole खुर्द येथील यादववाडी  येथे शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच सतिश कापसे, प्रा. पंढरीनाथ कापसे,माजी उपसरपंच संजय लोहार, चेअरमन सुभाष पाटील, व्हा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, पोलिस पाटील विजय लोहार,तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील, ग्रा.समस्या सौ. संगीता लोहार, ग्रा.समस्या सौ. कमल यादव,सोसायटी संचालक संजय पाटील, अशोक पाटील, महादेव कापसे, धनाजी भरूगडे,माजी चेअरमन अविनाश साळुंखे, माजी सरपंच बी.एम. पाटी...

काळगाव चे ग्रामदैवत श्री निनाईदेवी यात्रा सोमवारी संपन्न होत आहे. त्यानिमित्त "स्पंदन एक्सप्रेस" ने विशेष अंक प्रसिद्ध केला आहे

Image