नागपंचमीचा पारंपारिक सण कुंभारगाव मध्ये उत्साहात साजरा

कुंभारगांव /राजेंद्र पुजारी यांचेकडून

                    ग्रामपरंपरा आणि वंश परंपरेला जपणारा नागपंचमी सण  हा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येणारा महत्त्वाचा सण आहे या दिवशी प्रकृतीचे रक्षण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे मित्र मानल्या जाणाऱ्या नागदेवतेची (सर्पदेवता) मनोभावे पूजा केली जाते नागपंचमीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व श्रीकृष्ण आणि कालिया नाग: भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून त्याला वरदान दिले आणि लोकांना त्रासमुक्त केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नाग पूजेची परंपरा सुरू झाली ह्या नागदेवतेला दूध,लाह्या,फुलांचा नैवेद्य दाखवला जातो,

                नागपंचमी सण कुंभारगाव तालुका पाटण येथे नाभिक समाजाच्या पुढाकाराने अत्यंत श्रद्धा भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला बेंदूर सण पार पडल्यानंतर नाभिक समाजातील सर्व कुटुंबे वारुळाचे पूजन करून एक महिना अगोदर सणाची तयारी सुरू करतात या काळात वारुळाची माती घरी आणून ती माती वापरून नागदेवतेची प्रतिकृती मूर्ती बनवल्या जातात अहोरात्र मेहनत करून बनवलेल्या या मूर्ती परंपरागत पद्धतीने पूर्वीपासून गावातील बारा बलुतेदार यांना वाटून दिलेल्या नाभिक समाजाकडून कुळांना नागदेवता चे वाटप केले जाते या नागदेवतेच्या मूर्ती  कुळांना दिल्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यावर  नाभिक समाजातील अनेक कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी ग्रामदेवतेचे सेवकरी असलेल्या कुटुंबात नागदेवतेची मूर्ती बनवण्याचे कार्य पार पडते.

                सणाच्या दिवशी सकाळी सर्व नाभिक समाज कुटुंबासह एकत्र येऊन नागदेवतेची पूजा व महाआरती पार पडते यानंतर वाजत गाजत मिरवणुकी द्वारे नागदेवतेच्या मूर्तीचे मंदिराकडे प्रस्थान होत मंदिरात स्थानापन्न केले जाते या दिवशी गावातील सुहासिनी माहेरवाशी महिला वर्ग या नागदेवतेची मंदिरात मनोभावे पूजा करतात पुरुष वर्ग नागपंचमीस पूजन केलेले पवते डाव्या हातात बांधतात तर महिला वर्ग त्या गळ्यात बांधतात रक्षाबंधन दिवशी हे पवते वाहत्या पाण्यात विसर्जित केले जाते व रक्षाबंधन सण साजरा केला जातो ही परंपरा आजही कुंभारगाव सारख्या ग्रामीण भागात निष्ठेने व श्रद्धेने पाळली जाते सायंकाळी सात वाजता नागदेवतेची आरती करून नागदेवता मूर्ती  पाण्यात विसर्जित करण्यात येते हा नागपंचमी सण-उत्सव यशस्वी करण्यासाठी नाभिक समाजातील बाबा शेटे, तुकाराम शेटे, राजेंद्र शेटे,विनोद शेटे, सुरेश शेटे, दत्तात्रेय शेटे,दत्तात्रय झेंडे, महेश शेटे, विनीत शेटे,संजय शेटे, आनंद शेटे, तानाजी शेटे, दीपक शेटे, सतीश कदम, हर्षवर्धन यशवर्धन शेटे, नंदकुमार शेटे, प्रवीण शेटे, प्रशांत शेटे,तसेच कुंभार गावचे पोलीस पाटील अमोल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग