सामाजिक बांधिलकी जपत काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिघची शाखेचा वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी

काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिघची (ता. आटपाडी) शाखेचा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकीचे भान जपत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक-चेअरमन रमेश (आप्पा) बाबूराव घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. केवळ बँकिंग व्यवसाय न करता सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने वर्धापन दिनानिमित्त शाखेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेले होतकरू विद्यार्थी, सन्मानित शिक्षक, महिला बचत गटांच्या अध्यक्षा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शाखेचे सल्लागार प्रशांत सावंत यांनी संस्थेचे चेअरमन रमेश (आप्पा) घाडगे यांचे स्वागत करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पळसखेलचे उपसरपंच बबन कवितके, रज्जाक जमादार, महाराज विजय रामिष्ठे, डॉ. श्रीकांत भगत, वैशाली शिंदे, पंचशीला वाघमारे, राघोबा रणदिवे, शिवाजी पुसावळे, प्रवीण पुसावळे, जगन्नाथ सातपुते आणि सुरज गवळी यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या.

ग्राहकांना तत्पर आणि विश्वासार्ह सेवा दिल्याबद्दल उपस्थितांनी शाखा व्यवस्थापक सुरज बोराडे, शामराव जावीर व मोनिका रणदिवे यांच्या उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक केले. या स्नेहमेलनाला संस्थेचे सर्व संचालक, ठेवीदार, कर्जदार, सल्लागार, पिग्मी एजंट, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग