प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्त बीड व संभाजीनगर जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप

 


            ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच,शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था नेहमी प्रयत्नशील आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सतत कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने बीड जिल्ह्यातील शिवणी व संभाजीनगर जिल्ह्या ता. पैठण या पूरग्रस्त भागातील शाळेत कार्यक्रम शनिवार दि.22 नोव्हेंबर  2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण 150 विद्यार्थ्याना "स्कूल किट"चे वाटप करण्यात आले.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संस्थेच्या सभासदांनी जी सामाजिक बांधिलकी जपून जी मदत केली त्याचे समाधान लाभले. पुरामुळे भरपूर नुकसान सहन करावे लागले होते, त्यातच हि मदत त्यांना लाख मोलाची ठरली.

        यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आंनद कदम, प्रशांत खरात, विजय कदम, श्याम खेडेकर,प्रताप कदम,महादेव खरात  तसेच शिवणी गावचे सरपंच अजय सुपेकर, उपसरपंच कॉ. सुधाकर डोळस आणि समाजसेवक ज्योतीराम हुरकुडे तसेच पैठण गावचे अशोक पाठक आमदार, विष्णू अण्णा बोडके आणि  इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक तसेच इतर प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न