वडिलांच्या स्मरणार्थ करपे बंधूंचे आदर्श कार्य

 तळमावले - लोकसहभागातून गावविकास साधता येतो, याचे उत्तम उदाहरण करपेवाडी गावचे सुपुत्र तथा सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेले मा. संतोष विष्णु करपे व विक्रम विष्णु करपे यांनी दिले आहे. त्यांनी त्यांचे वडील कै. विष्णु गणपती करपे (आप्पा) यांच्या पावन स्मरणार्थ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी मेन रोड व स्मशानभूमी परिसरात एकूण ५ बेंच उपलब्ध करून दिल्या आहेत.

या बेंचमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, पादचारी तसेच स्मशानभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी मोठा आधार मिळणार आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा इतर प्रसंगी बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न