सचिन च्या चहाची चवच न्यारी.....पण भागवेना कोणी उधारी


नितिन बेलागडे/ढेबेवाडी 
घरात वृध्द आई बायको आणि चार मुलं त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो चहा विकतोय त्यांच्या चहाची चवच लय न्यारी आहे पण सध्या त्याची कोणी भागवेना उधारी त्या मुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे.
ढेबेवाडी येथील सचिन बेडखळे यांच्या वडिलांच्या पासून चहा चा व्यवसाय आहे. निस्वार्थ भावनेने गेली चाळीस वर्षे पन्नास वर्षे हा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला आहे. सचिन बेडखळे यांचे वडील ढेबेवाडी येथील डॉ राव यांच्या दवाखान्यात जवळ छोट्या टपरीवर हा व्यवसाय करीत होते. दवाखान्यातील रुग्णांना व य भेटायला येणार्या नातेवाईकांना त्या मुळे चहा उपलब्ध होत होता. डॉ राव दवाखाना बंद झाल्या नंतर  आता सचिन बेडखळे यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुन्हा घरी चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. ढेबेवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोर त्याच घर आहे त्या घरातच तो चहा बिस्किटे विकतो. किंबहुना भोसगाव, आवाड, आण्णासाहेब पाटील नगर,आय टी आय काॅलेज, पोलिस स्टेशन,  ग्रामीण रुग्णालय,  कभापा विद्यालय, प्राथमिक शाळा ढेबेवाडी, वनविभागाच्या कार्यालय, दुकानदार व्यापारी यांना मोबाईल काॅलवर जागेवर चहा पोहच करण्याच काम हि दिवसभर तो करतोय.
अलीकडच्या काळात सचिन मानसिक द्रष्ट्या खुप अस्वस्थता दिसत आहे. दैनंदिन तरुण भारत सोबत बोलताना तो म्हणाला मी सध्या आर्थिक संकटात सापडलो आहे. चहा विकतोय पण चहा ची उधारी कोणी देत नाही. एका ठिकाणी चहाची तब्बल सोहळा हजार रुपये उधारी अडकली आहे. मागायला गेल्यावर आज देतो उद्या देतो असंच सुरू आहे गेले अनेक महिने वसुली होत नाही आहे उधारी वाढत चालली आहे जगायचं कसं खायचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैराश्य येते आहे कुटुबाची काळजी आहे पोट कसं भरायचे हे कळतं नाही. या बाबत आतील कप्पे खोलीत तो खूप भावनिक झाला होता त्याच्या डोक्यात वेदना होत्या. येथील  ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सोहळा हजार रुपयांचा चहा प्यायला आहे आणि गेले अनेक महिने पैसे देत नाहीत हे खुप भयानक आहे. 
सचिन च्या चहाची चवच न्यारी पण कोणी भागवेना उधारी अशी स्थिती आहे  उधारी मिळाली नाही तर पोलीसात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"संपूर्ण ढेबेवाडी परिसरात फोन आला कि मी चहा पोहोचवतो  काही लोक खूप चांगली आहे. ते पैसे लगेच देतात चहा ची तारीफ पण करतात आणि काही ठिकाणी उधारी आहे. ती मागीतली तरी देत नाहीत ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हा तब्बल सोहळा हजार रुपयेचा चहा प्यायला आहे. पण उधारी देत नाहीत खुप महिने वसुली झाली नाही. त्यामुळे मी खूप आर्थिक संकटात सापडलो आहे."
-सचिन बेडखळे (चहा विक्रेते)

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न