मलकापूर क्लबमधील सर्व रोटरीयन काम करतात ही स्तुत्य बाब - प्राचार्य अभयकुमार साळुंखे


कराड/स्पंदन वृत्तसेवा

           रोटरी क्लब ऑफ मलकापूर नूतन संचालक मंडळाचा पद्ग्रहण समारंभ हॉटेल सफायर मलकापूर येथे श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकु मार साळुंखे व सहाय्यक प्रांतपाल रो.गजानन माने यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला . 

        पदग्रहण ग्रहण समारंभ सुरु होण्यापूर्वी आदर्श विद्यामंदीर विंग व जिंती ता. पाटण येथील प्रत्येकी पाच असे एकूण दहा विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी अध्यक्ष रो. विलासराव पवार यांच्याकडून चार्टर स्विकारून नूतन अध्यक्ष रो.चंद्रशेखर दोडमणी यांनी सूत्रे स्विकारली . कार्यक्रमाची सुरुवात झाडाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली. कु.समीक्षा हीने स्वागत पर प्रार्थना पियानोवर म्हटली. रो. संभाजीराव पाटील यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले. नंतर गत वर्षात रोटरी फाऊंडेशनला देणगी देऊन पी एच एफ पिन मिळविणारे रो.सलीम मुजावर (मेजर डोनर ) रो.स्वाती पाटील (मानद सदस्या ) रो. विजय चव्हाण , रो. संभाजी पाटील, रो. विजय लिगाडे, रो.यास्मीन मुजावर (मानद सदस्या ) रो.संदीप पाटील, रो. विलास पवार रो विनोद आमले तसेच मानद सदस्या विजया माने, रो. कविता कचरे यांना पिन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षात नूतन रोटरी सदसत्व स्विकारलेले रो.संजय बडदरे, रो.डॉ.सतिश संकपाळ. रो. शिवाजी पाचुपते रो.सुनिल बसुगडे रो.दादा देवकर रो.सरोज व तेजस सोनवले, रो.मनोज डाके यांचा मेंबरशीप प्रमाण देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी बुलेटीन नया विश्वास चे प्रकाशन करण्यात आले. व नूतन अध्यक्ष रो. चंद्रशेखर दोडमणी यांनी मनोगत करून येणाऱ्या काळात कोणते प्रोजेक्ट राबविणार याची माहिती दिली. 

            सहाय्यक प्रांतपाल रो.गजानन माने यांनी डी.जी.डॉ.सुरेश साबू यांचा संदेश वाचून दाखविला. नंतर प्रमुख पाहुणे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना रोटरी क्लब ऑफ मलकापूर च्या सर्व रोटरीयन्स आपल्या कार्याबददल शुभेच्छा दिल्या तसेच माझा एक विद्यार्थी रोटरी क्लब ऑफ मलकापूर अध्यक्ष होत आहे याचा मला आनंद होत आहे असे म्हणाले. मी नेहमी शाळा महाविद्यालयाच्या शिक्षक सेवा निवृती समारंभ नाहीतर गॅदरींग समारंभास नेहमी जात असतो परंतु आज एका आगळ्या वेगळया रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या पदग्रहण शानदार अशा कौटुबिक व मैत्रीपूर्वक कार्यक्रमास मला माझा विद्यार्थी रो.चंद्रशेखर दोडमणी याच्या आग्रहाखातर माझा एक विद्यार्थी शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या सेवेचा वारसा रोटरीच्या माध्यमातून करीत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असे आपल्या मनोगतात म्हणाले. 

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो.दिलीपराव संकपाळ, रो.सरोज सोनवले, रो.शुभांगी शेलार यांनी केले. सदर समारंभास रोटरी क्लब ऑफ कराड, उब्रज, पाटणचे अध्यक्ष सेक्रेटरी उपस्थित होते. तसेच सर्व रोटरीयन्सच्या कुटुंबातील सदस्य बहुसंखेने उपस्थित होते. तसेच प्रामुख्याने नितीन पाटील/सखाराम माटेकर/ नूतन अध्यक्ष यांच्या मातोश्री श्रीमती सिताबाई वय वर्षे ८२ याही उपस्थित होत्या. काही पत्रकार मित्र देखील उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे रो.विकास थोरात सेक्रेटरी यांनी आभार मानले वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग