एक वही,एक पेन शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळा चा विधायक उपक्रम

                राजापूर : तालुक्यातील नाटे गावातील शिवतेज ग्रामस्थ  मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळ गेली कित्तेक वर्षे कला, क्रिडा, सांस्कृतिक,क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या विभागात दरवर्षी  लोकपयोगी,नाविन्यपूर्ण विधायक उपक्रम हे मंडळ यशस्वी पणे राबवीत असते.

                गेल्या वर्षभरात मंडळाने महिलांसाठी सेनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण,शालेय मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप,मोफत छ्त्री वाटप,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,दिवाळीत प्रत्येक घरात  रांगोळी साहित्याचे मोफत वितरण,वृक्षारोपण,न्यानाची शिदोरी हा शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम,लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा यांसारखे विधायक उपक्रम राबवण्यात आले.

                मंडळाचा विधायक कामाचा आलेख खूप मोठा व अभिमानास्पद आहे.विभागातील शेकडो ग्रामस्थांच्या डोळ्यांचे मोफत मोतीबिंदूचे तपासणी शिबिरे भरवून मोतीबिंदूचे निदान झाले त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले,वैद्यकीय क्षेत्रात करोना काळात उत्तम काम केल्याबद्दल डाॅक्टर यांना करोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

             सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळा ने पंचक्रोशी आणि तालुक्यात आपल्या कार्याचा जणू ठसाच उमटवला आहे.

            या वर्षी पुन्हा एकदा उंच भरारी घेत मंडळाने एक पेन एक वही या उप्रकमाचे नियोजन करून आपल्या भागात शाळेत शिकणा-या मुलांसाठी वही व पेन देवून शालेय विद्यार्थी मित्रांना एक हात मदतीचा देण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम हे मंडळ दरवर्षी यशस्वी पणे राबवते हे विषेश.या उपक्रमासाठी  दानशूर व्यक्तींनी मोठ्या मनाने आपला एक हात मदतीचा देवून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळाचे विद्यमान प्रमुख कार्यवाहक श्री उमेश महादेव जवरे व श्री राजेश प्रेमाजी मांडवकर  व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री  रविकांत जवरे,श्री दिपक घाडी,श्री किशोर जवरे यांनी केला आहे. या उपक्रमासाठी संपर्क करण्यासाठी व गुगल पे नंबर ८९७६२८०८९० या नंबर वर आपण गुगल पे द्वारे देणगी देऊन सहकार्य करू शकता.

            आपले मदतीचे एक पाऊल शालेय विद्यार्थी मित्रांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना उंच भरारी घेण्यासाठी  खूप मोलाचे ठरेल येवढे नक्की.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न