महात्मा गांधी विद्यालयात नवागताचे वाजत गाजत स्वागत
पाचवड,दिनांक,15 जून 2024
विद्यालय सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून वाजत गाजत स्वागत करीत विद्यालयात आणले,त्यांचे स्कूल कमिटी चे सदस्य श्री.भरत गायकवाड दादा श्री.प्रकाश पारखे दादा तसेच प्राचार्य सौ.मुल्ला एन.एस.यांनी गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून स्वागत केले.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण केले.याच कार्यक्रमात विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.कचरे बाळासाहेब यांचाही रोटरी क्लब चा उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून नेशंन बिल्डर पुरस्कार मिळाल्या प्रीत्यर्थ विद्यालय तर्फे सत्कार केला.विद्यालयातील कामसू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ठ कामा बद्दल गौरविण्यात असले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाटोळे साधना यांनी केले प्रास्ताविक श्री.खरात सर यांनी केले.प्राचार्य सौ .मुल्ला एन.ए.यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या,आभार प्रदर्शन हे सौ.पद्मिनी मोकाशी मॅडम यांनी केले.सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Comments
Post a Comment