काकासाहेब चव्हाण काॅलेज येथे संगणक कक्ष आणि नॅक प्रोजेक्ट रूम बांधकामाचा शुभारंभ

तळमावले/वार्ताहर

                पाटण तालुक्यातील तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज मध्ये संगणक कक्ष आणि नॅक प्रोजेक्ट रूम बांधकामाचा शुभारंभ करण्यता आला. कॉलेजचे प्राचार्य डाॅ.अरुण गाडे यांचे मार्गदर्शनानुसार आणि प्रा.ए.कणसे, बापू सावंत, प्रा.यू.आर.माने, सुपुगडे सर, काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने  आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांनी ठरविल्याप्रमाणे झाले. प्राचार्य डाॅ.सतीश घाटगे, राजाभाऊ माने, आनंद साळुंखे, प्रा.सुपूगडे, प्रा बागवान, कंत्राटदार बालाजी इत्यादी मान्यवरांचे हस्ते हा शुभारंभ समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रा.सुरेश यादव, अशोक दिंडे, रमेश मोरे, अरुण शिबे, प्रा.सादळे, प्रा.साळुंखे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

                या छोटेखानी उदघाटन कार्यक्रमानंतर काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ कार्यकारिणी सदस्य तसेच कॉलेजचे प्राध्यापक यांची बैठक पार पडली. यावेळी काकासाहेब चव्हाण कॉलेजचे माजी प्राचार्य सतीश घाटगे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न