.....आणि त्यांनी जिंकली जगण्याची लढाई


तळमावले/संदीप डाकवे

‘‘अनंत अमुची ध्येयाशक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’’ कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या ओळी अनेकांनी शाळेत असताना ऐकल्या असतील. मात्र या कवितेतील ओळीप्रमाणेच अनिल वायचळ यांनी समुद्रात सुमारे 9 तास झुंज देत जगण्याची लढाई जिंकली....

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील वायचळवाडी (कुंभारगांव) येथील अनिल निवृत्ती वायचळ हे मुंबईतील अॅफकाॅन इन्फ्रास्टक्चर लिमिटेड कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करत आहेत. अनिल वायचळ आणि त्यांचे सहकारी हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लांटवर काम असल्याने डयुटीवर होते. गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्राला तौक्ते वादळाने तडाखा दिला आहे. ओएनजीसीच्या प्लांटवर काम करत असलेल्या अनिल वायचळ आणि त्यांचे सहकारी यांना तौक्ते चक्रीवादळाचा संदेश मिळाला होता. मात्र ते ज्या जहाजावर थांबले होते ते मजबूत होते. त्यामुळे धोका निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. असे त्यांनी सोमवारी (दि.17) रोजी घरच्यांना मेसेज करुन कळवले देखील होते. 

परंतू त्यानंतर तौक्ते चक्रीवदाळाने खवळलेल्या समुद्रात त्यांचे जहाज बुडू लागल्याने अनिल व त्यांचे सहकारी यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेतल्या. तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही जण अडकून भरकटले. तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. सुमारे 9 तास ते जणू मरणाशी झुंज देत होते. रात्री 2.30 च्या दरम्यान नौदलाचाच्या बचाव पथकाने  त्यांना बोटीवर घेवून किनाÚयावर आणले. दुसÚया दिवशी ते सहा वाजता मुंबईतील घणसोली येथील त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर घरच्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अनिल वायचळ त्यांचे सहकारी व कुटूंबीय यांनी नौदलाच्या पथकाचे आभार मानले. वायचळ कुटूंबीय व मित्रपरिवारांनी अनिल यांचे औक्षण करत स्वागत केले. त्या सर्वांचे डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते. नौदलाचे परिश्रम, नशीब आणि सर्वांचे आशीर्वाद यामुळे जीवघेण्या प्रसंगातून वाचलो अशी प्रतिक्रिया अनिल वायचळ यांनी व्यक्त केली आहे. 

‘‘अनंत अमुची ध्येयाशक्ती, अनंत अनृ आशा, किनारा तुला पामराला’’ या कवितेच्या ओळीप्रमाणेच अनिल वायचळ यांनी समुद्रात सुमारे 9 तास झुंज देत जगण्याची लढाई जिंकली असेच म्हणावे लागेल.





Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न