Posts

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा अहवाल

Image
 स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा अहवाल  https://heyzine.com/flip-book/a0bb1b0bdf.html

डाॅ.संदीप डाकवे यांचा जीवनप्रवास..

Image
 डाॅ.संदीप डाकवे यांचा जीवनप्रवास.. https://heyzine.com/flip-book/c7e3c72e23.html

आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमी परिसरात केले वृक्षारोपण

Image
प्रतिनिधी : पत्रकार व समाजसेवक भिमराव धुळप यांच्या मातोश्री बाळकाबाई हिंदुराव धुळप यांच्या रक्षाविसर्जन नंतर काळाजी गरज म्हणून 'झाडे लावा, झाडे जगवा' या उद्देशाने कोपरखैरणे, नवी मुंबई येथील मुक्तीधाम स्मशानभूमी मध्ये आंबा, पेरू, पिंपळ अशा विविध प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण केले. वृक्षप्रेमी संजय भावके यांच्या सहकार्याने हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आला. यावेळी दैनिक महासागरचे उपसंपादक गजानन तुपे, वृक्षप्रेमी संजय भावके, राघव साळुंखे, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप, गणेश धुळप आदी उपस्थित होते.

मलकापूर क्लबमधील सर्व रोटरीयन काम करतात ही स्तुत्य बाब - प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Image
कराड/स्पंदन वृत्तसेवा              रोटरी क्लब ऑफ मलकापूर नूतन संचालक मंडळाचा पद्ग्रहण समारंभ हॉटेल सफायर मलकापूर येथे श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकु मार साळुंखे व सहाय्यक प्रांतपाल रो.गजानन माने यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला .            पदग्रहण ग्रहण समारंभ सुरु होण्यापूर्वी आदर्श विद्यामंदीर विंग व जिंती ता. पाटण येथील प्रत्येकी पाच असे एकूण दहा विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी अध्यक्ष रो. विलासराव पवार यांच्याकडून चार्टर स्विकारून नूतन अध्यक्ष रो.चंद्रशेखर दोडमणी यांनी सूत्रे स्विकारली . कार्यक्रमाची सुरुवात झाडाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली. कु.समीक्षा हीने स्वागत पर प्रार्थना पियानोवर म्हटली. रो. संभाजीराव पाटील यांनी फोर वे टेस्टचे वाचन केले. नंतर गत वर्षात रोटरी फाऊंडेशनला देणगी देऊन पी एच एफ पिन मिळविणारे रो.सलीम मुजावर (मेजर डोनर ) रो.स्वाती पाटील (मानद सदस्या ) रो. विजय चव्हाण , रो. संभाजी पा...

डाकेवाडीत स्पर्धेच्या उपक्रमातून साकारणार वाचनालय

Image
तळमावले/वार्ताहर                 पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले जातात. यासाठी स्पर्धकांकडून तीन दिवाळी अंक आणि पुस्तकाच्या प्रती मागवल्या जातात. या तीनमधील एक प्रत सार्वजनिक ग्रंथालय, एक प्रत पुस्तकांचं झाड या उपक्रमास आणि उर्वरित शिल्लक राहिलेली प्रत नियोजित वाचनालयात ठेवण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वतःच्या घरी सार्वजनिक वाचनालय सुरु करणार असल्याची माहिती डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी डाकवे परिवाराने राबवलेला उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असाच आहे. आपणही पुस्तके देवून या वाचन चळवळीत सहभागी होवू शकता.  या सार्वजनिक वाचनालयात असलेली पुस्तके मोफत वाचायला मिळणार आहेत. वाचकांनी स्वतःची नोंद करुन पुस्तके वाचण्यासाठी घरी घेवून जायचे आहे. वाचून झालेली पुस्तके परत वाचनालयात जमा करायाची आहे...

राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर                पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.                यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे: शशांक दि.देशमुख (अभिधा), गीतेश गजानन शिंदे (सीसीटीव्हीच्या गर्द छायेत), भारत सातपुते (जागरण), जयश्री कुलकर्णी अंबासकर (चिंब सुखाचे तळे), डाॅ.आदिती काळमेख (दिडदा दिडदा), सौ.रश्मी रविंद्र गुजराथी (आनंदाच्या बिया), सुभा लोंढे (तुटलेला धागा), सौ.गायत्री मुळे (वास्तुपुरुष), इंद्रजित कल्याण पाटील (शेलक्या बारा), विक्रांत शिवराम केसरकर (सुंदर माझे गांव-मु.पो.हेदूळ (वर्णन),  रश्मी पदवाड-मदनकर (पद्मकोश), सौ.जय...

प्रेमाची आठवण❤️....या गीताचे इस्लामपूरमध्ये चित्रीकरण सुरू

Image
स्पंदन वृत्तसेवा/सत्यवान मंडलिक यांचेकडून                के. चंद्रा प्रॉडक्शन इस्लामपूरची निर्मिती असलेले प्रेमाची आठवण या भावना प्रधान गीताचे चित्रिकरण इस्लामपुरात सुरू झाले आहे .याचा मुहूर्त माजी प्राचार्य श्री. विश्वास सायनाकर व सौ. मनिषा रवी बावडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.प्रमुख भूमिकेत प्रिया चव्हाण व चंद्रकांत कांबळे आहेत.बरखा करवा असिस्टंट डायरेक्ट, किरण जेजुरकर डी ओ पी तर असिस्टंट कॅमेरामन म्हणून किरण पोवार आहेत. राज पवार मेकपमन, आर्ट डारेक्टर मनोज वेटम, सुमित भंडारे , ऋषिकेश शिंदे हे काम पाहत आहेत. मुहूर्त प्रसंगी सुमित अय्यर हेमंत रकटे, अमोल वाघ ,सिने अभिनेते सत्याप्पा मोरे उपस्थित होते. दिग्दर्शक /गीतकार चंद्रकांत कांबळे असून गायिका संज्योती जगदाळे आहेत. संगीत ओमकार सुतार यांनी दिले आहे.लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला गोड प्रेमाची आठवण हे गीत के. चंद्रा या YouTube चॅनल वर पहायला मिळणार आहे.