तारा @वाल्मिक.COM


नितीन बेलागडे ढेबेवाडी यांचेकडून 

ताडोबाच्या अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली परीसरात सोडण्यात आलेली तारा आता चांदोली धरणाच्या जलाशय ओलांडून थेट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाल्मिक पठारावर दाखल झाली  आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून वाघ हा रोज किमान 10 ते 32 किमी अंतर पार करत असतो. अशी माहिती समोर येत आहे त्यामुळेढे बेवाडी विभागात  भितिचे वातावरण निर्माण झाले आहे असुन ग्रामीण भागातील लोकांची सहाच्या आत घरी पोहचण्यासाठी घाई गडबड दिसत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कमि झालेली वाघांची संख्या वाढविण्यासाठी वन्यजीव विभागाने ताडोबा च्या अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली तारा वाघीण 18 डिसेंबर रोजी पहाटे विलघ्न वासाच्या पिंजऱ्यातुन बाहेर  पडल्यानंतर ताराने  सोनारलीचे पठार गाठले तिथे  दिवसभर बसून  राहिल्या नंतर 19डिसेंबर रोजी ती पठारावर वरून खाली चांदोली धरणाच्या बॅकवॉटरच्या दिशेने चालू लागली बॅकवॉटर च्या भागात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ती दिवसभर बसून राहिली. यावेळी ती धरणाच्या पलीकडील दिसनारा भाग निरखून पाहत होती. धरणाच्या पलीकडे जमीन असल्याचा अंदाज तिला आला असावा या वेळी मॉनिटरिंग टीम तिच्या मार्गावर लक्ष ठेवून होती सायंकाळी सहा वाजता ती तेथून उठली आणि पाण्याच्या दिशेने चालत गेली.

मॉनिटरिंग टीमच्या लक्षात येण्याअगोदर तिने पाण्यात उडी घेतली. त्यावेळी मॉनिटरिंग टीमला वाटले की निवळी प्रर्यत ती जाईल  मात्र तसे न होता ती 200 मीटर पाण्यात गेली आणि तिने आपला विचार बदलला आणि लेफ्ट टर्न मारून ती जिथे जास्त मगरीचे वास्तव आहे अशा पाण्यातून दीड किलोमीटर  अंतर पार करत झोंबीच्या पठारावर दाखल झाली.

दोन दिवसांपूर्वी  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाल्मीक पठारावरील मांईगडेवाडी गावाजवळ तारा वाघीणीचे दर्शन झाले. तिच्या गळ्यातील कॉलर आयडी मुळे तिची ओळख निश्चित करण्यात आली आहे. दिड किलो मिटर मगरीने भरलेले धरण न थांबता पार करून ताराने महाराष्ट्राच्या व्याघ्र संवर्धनात ऐतिहासिक नोंद केली आहे. दरम्यान, ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर ताराचे दर्शन झाल्याने विभागात भितीचे वातावरण पसरले आहे काही दिवसापूर्वी भालेकरवाडी येथे बिबट्याने गवत कापत असलेल्या एका महिलेवर हल्ला केला होता. त्यामुळे विभागा त अगोदरच बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागातील अनेक गावात जवळ गवे बिबटे यांनी धुमाकूळ घातला आहे. तारा वाघीणीचा वाढता संचार आता पाटण तालुक्याच्या हद्दी पर्यंत वाढला असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या दृष्टीने हा सकारात्मक संकेत मानला जात आहे. मात्र विभागातील ग्रामस्थांच्या मधून प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग