चाफळ विभागात अवैध वृक्षतोड

चाफळ/सुनील पवार यांचेकडून

            समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चाफळ विभागात अगदी निर्धोकपणे सागाची वृक्षतोड सुरू आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चाफळ परिसरातील वनसंपदा गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी होत असताना अशाप्रकारे होणारी वृक्षतोड ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

            उन्हाळा सुरू झाल्यामुळे पानगळ सुरू आहे. जंगलातील गवत सुकले आहे. याच कालावधीत दरवर्षी जंगलात मोठ्या प्रमाणावर वणवे लागून अनेक वनस्पती, प्राणी आणि पक्षी प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशातच यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे चाफळ विभाग, पाटण तालुका, सातारा जिल्हा पर्यटन भरारी घेण्याच्या तयारीत असताना अशाप्रकारे होणारी वृक्षतोड हा पर्यटन, पर्यावरण आणि एकूणच निसर्गाची हानी करणारी आहे. वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरीकांमध्ये या बाबीचा असंतोष खदखदत आहे

            तसेच एखादा शेतकरी त्याच्या बांधावरील एखादे लाकुड सरपणासाठी किंवा शेतीकामासाठी अवजारे करण्यासाठी तोडले तर काही महाभाग ही बातमी गुपचूप वनविभागाला कळवून त्याचा लाकूडफाटा पकडून देत आहेत. दंड वसूल करून त्या दंडा बरोबर आपले कमिशन काढत आहेत. मात्र बिगर परवाना, अवैध ताकुडतोड कुणाच्या वरदहस्ताने करण्यास मिळत आहे. यांचे आका कोण?

             काही समाजकंटक मुक्या प्राण्यांसाठी साठवून ठेवलेल्या गंजी  याला  आग लावत आहेत व राक्षसी विचार करून मुक्या जनावरांची त्यांना दया माया नाही.तरी चाफळ विभागातील  अज्ञाताने लावलेल्या आगीत यांचे पंचनामे करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळावा.

            जंगल कमी होत असल्याने रानडुक्कर, वानर, गव्यासारखे प्राणी शेतात आसरा आणि आपले उपजिवीकेचे साधन शोधत आहेत. या जनावरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून त्याचे यंत्रणांना स्वैर सुतक नाही. मात्र गोरगरीब जनतेला लुटण्याचे उद्योग मात्र बिनबोभाट सुरू आहेत. शेतकरी वर्गाला त्याचे जनावर याला जंगली श्वापदांचा उपद्रव झाला  तर त्याला  पंचनामा व भरपाई मिळण्यासाठी सहा महिने किंवा वर्षभर वाट बघत हेलपाटे मारावे लागतात. तरी संबंधित वनविभाग, पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून अवैध वृक्ष तोड थांबवून संबंधित व्यक्ती वर कडक कारवाई करावी तसेच कमिशन बहाद्दरांना चाप बसवावा अशी चाफळ विभागातून जनतेची मागणी होत आहे. 

            जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांनी याबाबत संबंधित खाते, यंत्रणां यांना जाब विचारून याबाबत लक्ष घालून प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवावी. अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न