देश निर्मीत मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे योगदान - प्राचार्य दिलीपराव संकपाळ
तळमावले दि.३० डिसेंबर
काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले ता पाटण जि सातारा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे महिंद ता पाटण जि सातारा दि.३० डिसेंबर २४ ते दि.५ जाने २५ अखेर संपन्न होत आहे.. आजचे १ ले पुष्प उद्घाटन कार्यक्रम सायं ४ वा संपन्न झाला.. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद केंद्र शाळा महिंद च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम पथकाने वाजत गाजत रा.से.यो.विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे आणि मान्यवर मंडळी यांचे व्यासपीठाकडे आगमन करण्यात आले...
प्रमुख पाहुणे -मा श्री प्राचार्य दिलीपराव संकपाळ (आजीव सेवक सदस्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), उद्घाटक - मा श्री महेश पाटील (सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बनपुरी) , अध्यक्ष - मा डॉ उषादेवी साळुंखे (प्रभारी प्राचार्य,के.सी.कॉलेज, तळमावले) प्रमुख उपस्थित - मा सौ नंदा शेंडगे(लोकनियुक्त सरपंच महिंद), मा सुरेश शेंडगे(उद्योजक, सातारा),मा विकास गोसावी (मा.संचालक लो.बा.दे.सह.साखर कारखाना मरळी), मा प्रा शिवाजीराव पाचुपते (माजी प्राचार्य ), मा परशुराम साळुंखे (मा.उपसरपंच महिंद),मा राहुल शेंडगे (सामाजिक कार्यकर्ते) इ.उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करून शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे स्वरचित प्रार्थनेने झाली ...रा.से.यो.विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटक, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थिती या सर्वांचा सत्कार व स्वागत कॉलेजचा झेप अंक,शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला... कार्यक्रमाचे उद्घाटक मा महेश पाटील म्हणाले कि , विशेष श्रमसंस्कार शिबिरातुन विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होत आणि व्यक्तीमत्वात बदल घडला जातो, विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराबरोबर संस्कार जपणे काळाची गरज आहे असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा प्राचार्य दिलीपराव संकपाळ सर म्हणाले कि या.से.यो. विभाग हा खर्या अर्थांने सन १९६७ मध्ये योजना चालू केली आणि १९६९ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते..गांधीजींनी आपल्या जीवनात राष्ट्रीय सेवा हाच धर्म जोपासला आणि मानला म्हणूनच याचवर्षी रा.से.यो.सुरू करण्यात आली या शिबीरातुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि संस्कार क्षम पिढी निर्माण होण्यास मदत होते तसेच युवकांमध्ये जीवनाच्या वास्तवतेची जाणिव निर्माण झाली आहे त्यामुळे ते समाजातील प्रश्न चांगल्या प्रकारची समजावून घेवून त्यांचे विश्लेषण करू लागले आहेत या योजनेमुळे देशसेवा घडली जाते व देश निर्मीतीत मोठा वाटा हा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा असतो.या योजनेद्वारे अत्यंत चांगल्या प्रकारची प्रशंसनीय व अनुकरणीय कामे करण्यात आली आहेत.त्यामुळे या या.से.योजनेला महत्त्व प्राप्त झाले व समाजामध्ये आदर व विश्वास निर्माण झाला आहे.. कार्यक्रम अध्यक्ष मनोगतात मा प्राचार्या डॉ उषादेवी साळुंखे मॅडम यांनी देखील कॉलेज मधील रा से योजनेचे आता पर्यंत ज्या ज्या गावात शिबिर संपन्न झाले ते सर्व गावे सर्वगुणसंपन्न झाली व विकासात्मक कामे होऊन वेगवेगळ्या राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्या यशामध्ये महाविद्यालयाच्या रा से योजनेचे फार मोठे योगदान आहे असे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी कार्यक्रमात पुढील मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली - प्राचार्य शिवाजीराव पाचुपते,मा श्री राहुल शेडगे,मा श्री रमेश महाडिक इ. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा महेश चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी यांनी केले व आभार प्रा ज्योती उर्फ मनिषा पाटील मॅडम यांनी मानले.. छायाचित्रे प्रा कारंडे सरांनी काढले . कार्यक्रमाचे नेटके नियोजन आनंदा घुगरे (कर्मचारी) व स्वयंसेवक यांनी केले..सळवे गावचे सरपंच ,रा से योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा डॉ संभाजी नाईक, प्रा डॉ उत्तम वाघमारे,प्रा विलास शेंडगे, प्रा सी जी पुटवाड, प्रा सौ बी एस सालवाडगी ,प्रा एस एन कारंडे( इ. राम.से.यो. सदस्य) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ,महिला , ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment