वरळी सानेगुरुजी कथामालेच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न


मुंबई/प्रतिनिधी

    वरळी सानेगुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष श्री रमेश तांबे यांच्या १) स्वराची ४२ पत्रे, २) शिक्षा आणि ३) गोष्ट सांगा गोष्ट या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री हनुमान मंदिर येथे मोठ्या थाटामाटात आणि प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी, लेखक आणि समीक्षक श्री रमेश सावंत हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सांनेगुरुजींच्या 'खरा तो एकचि धर्म' या प्रार्थनेने झाल्यानंतर वरळी कथामालेचे अध्यक्ष श्री देवकीनंदन मुकादम यांनी प्रास्ताविकामध्ये कथामालेच्या कार्याचा आढावा घेऊन सानेगुरुजी १२५ अभियानाचे महत्व विशद केले.
सदर तीन पुस्तकांचे परीक्षण सौ प्रज्ञा वनारसे, श्री सुकुमार नितोरे आणि श्री देवकीनंदन मुकादम यांनी केले व सदर पुस्तकातील गमती जमती सांगून पुस्तके विध्यार्थ्याना नक्कीच आवडतील असे आवर्जून सांगितले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग