वाईच्या गोरे दांपत्याचे पाणीदार गावांसाठी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदान

            


 वाई/प्रतिनिधी
                मूळचे दुष्काळग्रस्त माण तालुक्याची जन्मभूमी आणि वाई तालुका कर्मभूमी असलेले सौ.अनिता व गोरखनाथ गोरे हे वाई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बारा महिने दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असलेल्या या दांपत्याला पाणी डोळ्यात पाणी आणते हा अनुभव पाठीशी असल्याने वेळे भिलारवाडी येथे शासन, नाम फाउंडेशन,ज्ञानदीप परिवार व दानशूर दात्याच्या अर्थसहाय्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाणीदार गाव करण्यासाठी गेली २४ दिवस दुष्काळाचा पिच्छा सोडवण्यासाठी श्रमदान करत असल्याची माहिती समाजमध्यातून वाचनात आल्यावर गोरे दांपत्याने सामजिकतेचे भान ठेवत सामाजिक बांधिलकी म्हणून या कामात योगदान देण्याचा निश्चय केला.

           खरंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यात लोक मग्न असतात आणि गोरे दाम्पत्य इकडे श्रमदानातून पाणीदार गाव करण्यासाठी आपले योगदान देतात ही या दांपत्याची आगळीवेगळी सामाजिक बांधिलकीची जाणीवच म्हणावी लागेल.

          गोरे दांपत्याने भिलारवाडी पाणीदार गाव मोहिमेची माहिती घेऊन सकाळी सर्वांबरोबर श्रमदानासाठी उपस्थित राहिले तेही श्रमदान करणाऱ्या सर्व लोकांसाठी फलाहार घेऊन आणि सोबत गाव पाणीदार करण्यासाठी आपल्या परीने जे योगदान देता येईल ते देण्याच्या निश्चयाने.

            गोरे दाम्पत्याने श्रमदान संपल्यावर यापुढेही या चळवळीत सहभागी होण्याचा व जेव्हा जेव्हा सामाजिक काम असेल तेव्हा खारीचा वाटा उचलण्याचा मानस व्यक्त केला.सामाजिक बांधिलकीने भिलारवाडीकर ग्रामस्थही भारावून गेले.उपसरपंच सौ.उषाताई पवार व सदस्य दिपक पवार यांनी गोरे दांपत्य हे खरेखुरे समाजशिक्षक असल्याची भावना व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न