येवती येथील बौद्धजन हितवर्धक संघाची पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका

          


उंडाळे (प्रतिनिधी) येवती ता.कराड येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी जाणवत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई यांच्या वतीने कैलास सोरटे, अशोक सोरटे यांच्यासह ग्रामस्थांनी कराडचे तहसीलदार व प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सदरच्या येवती गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. 

               अन्यथा 18  मार्चपासून  कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चा इशारा देण्यात आला आहे. येवती येथे जलजीवन मिशनच्या वतीने 1 कोटी 38 लाखाची योजना सध्या येवती मध्ये सुरू आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून ही योजना का थांबली. याची माहिती मिळावी व ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी बौद्धजन हितवर्धक संघ  वतीने  करण्यात आली. सदर योजना खूप दिवस झाले रखडल्यामुळे गावचा पाणी पाणी प्रश्न भेडसावत आहे.

                मागील वर्षी देखील याबाबत आवाज उठवण्यात आला होता मात्र तात्पुरता दिलासा म्हणून प्रशासनाच्या वतीने टँकर देण्यात आले. यावर्षी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत येवती गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा. अन्यथा दिनांक 18 मार्च रोजी आमरण उपोषणचा इशारा देण्यात आला आहे .

                या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी , आ.पृथ्वीराज चव्हाण, उद्योजक दीपक शेठ लोखंडे यांना देण्यात आल्या आहेत. 

            येवती येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू असून या पाणी योजनेची विहीर शेळकेवाडी जवळ असून या विहिरीतील पाणी विद्युत जोडणी केली तर जुन्या टाकीत पाणी टाकून या वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, यासाठी तातडीने विद्युत जोडणी व्हावी अशी मागणी केली आहे व त्यासाठी पत्रव्यवहार  केला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पंचायत समिती कराड यांनी येवती ग्रामपंचायतीला  लेखी कळविली आहे.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न