पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात प्रभाविरित्या ग्रामसुरक्षा कार्यान्वित होणार - अभिजीत चौधरी

           


तळमावले/वार्ताहर

             जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री.समीर शेख , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज शुक्रवार  दि- 24/11/2023 रोजी ढेबेवाडी पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600/9822112281 प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास अभिजीत चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी, गोपनीय अंमलदार श्री.प्रशांत चव्हाण, श्री गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, श्री.सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्यासह ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

            पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री.डी.के.गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे  प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन श्री अभिजीत चौधरी यांनी केले.

            *ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.

            गेल्या 13 वर्षांत पुणे,सोलापूर, अहमदनगर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट :

घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.

गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.

अफवांना आळा घालणे.

प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.

पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये :

संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा

गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत

संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281

यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.

संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.

दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात

नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.

एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.

वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.

घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही, तोपर्यंत रिंग वाजते.

संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.

चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.

गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.

सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य. 

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न