थोर स्वातंत्र्यसेनानी कै. बी. एन. तथा काकासाहेब चव्हाण यांनी अनेकांच्या जीवनात उजेड पेरला- प्राचार्य आर. के. भोसले


तळमावले /डाॅ.संदीप डाकवे

            थोर स्वातंत्र्यसेनानी कै. बी. एन. तथा काकासाहेब चव्हाण हे मानवतेचे पुजारी होते. सर्वसामान्य माणसाला उभा करण्याचे महान काम त्यांनी केले. अनेकांच्या जीवनात काकांनी उजेड पेरला,  असे प्रतिपादन  प्राचार्य  आर.के.भोसले यांनी केले.  तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज व वाल्मिकी विद्यामंदिर, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने  *थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण यांचा ५२ वा  पुण्यस्मरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे होते. प्राचार्य आर.के.भोसले  पुढे  म्हणाले, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण यांनी आधार दिला. आपलं जगणं कसं असाव ते शिकविणारा सुसंस्कार काकासाहेब चव्हाण यांनी सांगितला. आई-वडील, वडिलधारी मंडळी यांचा आदर, सन्मान ठेवा. माणसाला माणूस ओळखू लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनातील अंधःकार नाहिसा  होईल. थोर स्वातंत्र्यसेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण यांनी समाजातील दीन-दुबळ्या, पददलित समाजातील मुलामुलींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्न केले. काकांच्या दूरदृष्टीमुळे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षण घेता आले.                                              
            या समारंभास ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक,   गुरूदेव कार्यकर्ते, माजी  विद्यार्थी -विद्यार्थिनी  बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी प्रतीवर्षी जाहीर केलेली  पारितोषिके गुणवंत विद्याथ्र्यांना देऊन कौतुक करण्यात आले. बाळासाहेब पाटील (थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण यांचे नातू) आपल्या मनोगतात म्हणाले, स्वातंत्र्यलढयात काकांचे मोलाचे योगदान दिले आहे. आजोबा म्हणून मला त्यांचा प्रेमळ सहवास लाभला. करारी स्वभावाच्या काकांच्या अंतर्मनातील गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता या गुणांचे स्वानुभव त्यांनी कथन केले.  जनसेवक असणाऱ्या काकांनी  बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नरुपी पंखांत बळ दिले.      प्राचार्य डॉ. अरुण गाडे म्हणाले, काकांनी समाजातील  अनेक पददलित विद्यार्थी -विद्यार्थिनिंना शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले. त्यामुळे अनेक पिढया स्वावलंबी जीवन जगू लागल्या. त्यामुळे थोर स्वातंत्र्यसेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे.  तळमावल्याच्या निर्जन, ओसाड टेकडीवर डॉ.बापूजी साळुंखे  व थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कॉलेजची स्थापना झाल्याने  वांग खोऱ्याचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास घडून आला.                 
            या कार्यक्रमात पुढील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. राजभाऊ माने (अध्यक्ष,माजी विद्यार्थी मंडळ व मानेगाव ग्रामपंचायत सदस्य), प्रा एस बी जाधव,  अँड राम होगले इ.कार्यक्रमास पुढील मान्यवर मंडळी उपस्थित होते. महादेवराव पानवळ (माजी पं.स.सदस्य पाटण व कॉलेज विकास समिती ), श्री रमेश दत्ताजीराव पाटील (काकासाहेबांचे नातु ), चंद्रशेखर दोडमणी (रजिस्टार, विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर), सलीम मुजावर, अंकुश अतकरी (माजी उपसरपंच, तळमावले), तानाजी कत्रंत्रे (सदस्य, तळमावले ), रमेश मोरे (माजी सरपंच, साईकडे) , आनंदराव चव्हाण (कविवर्य कुंभारगाव), प्रा पी.डी.पाटील, संजय इंगवले, श्शंकर माटेकर इ. समारंभास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व सचिव सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य  डॉ.अरुण गाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन पुजारी यांनी केले. आभार प्रा.सौ.मिनाक्षी पाटील मॅडम यांनी मानले.





Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न