हरित विद्यालय संकल्पनेवर निशंक चा राष्ट्रीय महोत्सव

सातारा/प्रतिनिधी

निशंक सोसायटी फॉर एज्युकेशन,आर्ट अँड कल्चर ही भारत देश आणि समाजासाठी समर्पित, संवेदनशील, प्रेरणादायी शिक्षक, प्रशिक्षक व शिक्षणतज्ञांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली निशंक ही एक राष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. या सोसायटी मार्फत राष्ट्रीय महोत्सव सातारा येथील यशोदा टेक्नीकल कँम्पसमध्ये दिमाखदारपणे संपन्न झाला.हरित विद्यालय (ग्रीन स्कूल)या नव शैक्षणिक संकल्पनेच्या अनुषंगाने प्लॅस्टीक मुक्त शाळा करण्याची सुरुवात झाली, शिक्षण विभागाच्या सहकार्याने  शहरातील विविध शाळां चित्ररथ व विविध वेशभूषेसह जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. या मध्ये सातारातील विविध शाळांनी चित्ररथ तयार केले होते, तसेच चौकाचौकात लेझीम,झांजपथके, प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारी पथनाट्ये व गीतांचा या जनजागृती रॅलीत सहभाग होता, ही संदेशपूर्ण रॅली महाराजा सयाजीराव विद्यालयापासून सुरुवात होऊन राजपथावरून कन्याशाळा  व प्रतापसिंह हायस्कूल येथून खालच्या रस्त्याने पोवई नाका येथील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देत कर्मवीर समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून रॅली संपन्न झाली. 

या जनजागृती रॅलीमध्ये निशंक सोसायटीच्या अध्यक्षा प्रो.डॉ.पवन सुधीर विभागप्रमुख डीईएए,एनसीईआरटी, नवी दिल्ली,सचिव राजिंदर खजुरिया व खजिनदार चित्रगुप्त गोस्वामी तसेच उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे तसेच निशंक‌चे विविध राज्यातून आलेले  सन्माननिय सदस्य उपस्थित होते. सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी व निशंकचे सर्व राज्यातून आलेले १५० प्रतिनिधी २००० च्या वरती विद्यार्थी व शिक्षक असा मोठा समुदाय होता. शहरातून निघालेल्या या रॅलीत नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यशोदा टेक्नीकल कँम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक मा.श्री.दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांचे जल्लोषी स्वागत केले. एनसीसीच्या छात्र सैनिकांनी मानवंदना दिली.पथनाट्ये व गीते सादर केली. दुपारच्या सत्रात रंगावलीकार प्रताप जगताप व कौस्तुभ सुतार यांनी काढलेल्या रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले.  

Each School, Green School च्या अनावरण करण्यात आले. या प्रसंगी निशंक सोसायटीच्या अध्यक्षा प्रो.डॉ.पवन सुधीर यांनी ग्रीन स्कूल संकल्पना स्पष्ट केली. प्लॅस्टीक वापराचे दुष्परिणाम व हानिकारक जीवनावर होणारे परिणाम त्याचबरोबर ज्यांना स्वतःमध्ये, इतर लोकांमध्ये व आपल्या परिसरात अर्थपूर्ण बदल घडवून आणायचा आहे त्यांचे निशंक मनापासून स्वागत करते असे त्यांनी सांगितले माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.सौ.प्रभावती कोळेकर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.सौ.शबनम मुजावर व उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे यांनी आपल्या मनोगतात हरित विद्यालय (ग्रीन स्कूल)या नव शैक्षणिक संकल्पनेच्या अनुषंगाने प्लॅस्टीक मुक्त शाळा करण्याचे नियोजन सातारा जिल्हा करेल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशंक महाराष्ट्रचे अध्यक्ष विक्रम अडसूळ यांनी केले. यावेळी महाराष्ट्राची लोकधारा सादर झाली. लोकधारेचे निवेदन राजेंद्र आंधळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली चिंचोलकर यांनी केले. यावेळी संजीवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकधारा, पियुषा भोसलेने पोवाडा, शुभम मगदूमने वासुदेव,गोधंळी,यशोदा पब्लिक स्कूलने लावणीचे सादरीकरण केले. आभार प्रदर्शन श्री.बाळासाहेब कचरे यांनी केले. या कार्यक्रमास लाईफ मेंबर झहीर शेख, सुभाषचन्द्र बोंगाळे, अरुणा उदावत,यशश्री जाधव,निताली हरगुडे, संतोष देवघरकर, सुचरिता काळे, नंदिनी बर्वे, संगीता मोरे,नारायण मंगलाराम आणि राज्यातील शिक्षकांनी उस्फूर्तपणे हजेरी लावली. 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशंक महाराष्ट्रचे सचिव श्री.उमेश देशमुख व निशंक भारतचे गव्हर्नर बॉडी मेंबर श्री.सुनिल देसाई निशंक सदस्य सुनील लोंढे, मनीषा काळे, प्रसाद वालेकर, कांचन कोळी, माधुरी जाधव, अमोल बोधे, गणेश यादव, प्रज्ञा शिंदे, रुपाली कुमावत,योगिता भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्य़ातील कला व संगीत शिक्षकांनी खूप योगदान दिले. हा निशंक राष्ट्रीय महोत्सव यशस्वीपणे पार पाडला.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न