अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त भागाची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पाहणी
अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त भागाची गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पाहणी
तळमावले/संदीप डाकवे
पाटण तालुक्यात बहुतांशी भागात 15 मे रोजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने असंख्य घरांचे नुकसान केल्याने नुकसानग्रस्त नागरिक हवालदील झाल्याचे चित्र ढेबेवाडी विभागात पाहायला मिळत आहे. अशावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई नुकसानग्रस्तांची पाहणी केली. ‘‘वादळाने नुकसान झालेल्या वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोचून दोन दिवसांत पंचनामे सादर करा. त्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका’’, अशा स्पष्ट सूचना ना.गृहराज्यमंत्री देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना दिल्या. विभागात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री ना.देसाई यांनी आज पाहणी केली. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाÚयांशी संवाद साधला. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह महसूल, वीज, पाणीपुरवठा, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वादळी पावसामुळे ढेबेवाडी विभागातील निगडे, वरची शिबेवाडी (गुढे), अंबवडे खुर्द, चाळकेवाडी, मंद्रुळकोळे आदी ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यातील काही ठिकाणी मंत्री देसाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विभागातील एकूण नुकसानीचा बैठकीत आढावा घेतला.
ना.शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘पावसाळा तोंडावर आहे. उद्ध्वस्त निवारे तातडीने पुन्हा उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करा. कुणीही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. वाड्यावस्त्यांवर पोचून माहिती घेऊन दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम संपवा. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा.‘‘ अशा सूचना मंत्री देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
छायाचित्र - श्री.अनिल देसाई, महालक्ष्मी फोटोज कुंभारगांव




Comments
Post a Comment