Posts

Showing posts from November, 2023

महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक

Image
तळमावले/वार्ताहर                  राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात पाटण तालुक्यातील जिंती ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जिंती ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर जिंतीच्या ग्रामस्थांनी पावनगड निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करून सत्कार केला.                केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना यांचा लाभ महाआवास अभियानाद्वारे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला जात आहे. पाटण तालुक्यातील शिवसेनेची सत्ता असलेल्या जिंती ग्रामपंचायतीने महाआवास अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, याचा आनंद आहे. जिंती ग्रामपंचायतीने 2021-22 मध्ये 116 लाभार्थींना या अभियानाचा लाभ ...

पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात प्रभाविरित्या ग्रामसुरक्षा कार्यान्वित होणार - अभिजीत चौधरी

Image
              तळमावले/वार्ताहर                  जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री.समीर शेख , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज शुक्रवार  दि- 24/11/2023 रोजी ढेबेवाडी पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600/9822112281 प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास अभिजीत चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी, गोपनीय अंमलदार श्री.प्रशांत चव्हाण, श्री गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, श्री.सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा यांच्यासह ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.                पोलीस ...

ढेबेवाडी विभागातील यात्रेचा हंगाम सुरु, कुंभारगांवच्या लक्ष्मीदेवीची यात्रा 27 आणि 28 नोव्हेंबरला

Image
तळमावले/वार्ताहर                        पाटण तालुक्यातील मौजे कुंभारगांव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा सोमवार दि. 27 नोव्हेंबर, 2023 रोजी भर व मंगळवार दि.28 नोव्हेंबर, 2023 रोजी खेळणे होणार आहे. कुंभारगावच्या या यात्रेने ढेबेवाडी विभागातील यात्रेचा हंगाम सुरु होत आहे. सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी पहाटे श्री ची काकड आरती, दरम्यान नवसाचे दंडस्थान याने सुरुवात होणार असून अन्य धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालू राहतील. सायंकाळी 7 ते 10 देवीचा यात्रेचा महाप्रसाद भंडारा होणार आहे. याचवेळी मंदिराशेजारील तळ्याच्या काठावर पणत्या प्रज्वलीत केल्या जातात. रात्री 11 वाजता कुंभारगांव वाडी वस्त्यांवरील देवदेवता पालख्या, सासनकाठी यांचे ग्रामस्थ, कुंभारगांव यात्रा कमेटी कडून भव्य स्वागत करून त्यांचे मंदिराकडे प्रस्थान केले जाते. रात्री 12 वाजता वसंतराव वाडेकर कराडकर यांचा लोकनाट्या तमाशा होणार आहे.                     मंगळवार दि. 28...

काकासाहेब चव्हाण काॅलेज येथे संगणक कक्ष आणि नॅक प्रोजेक्ट रूम बांधकामाचा शुभारंभ

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज मध्ये संगणक कक्ष आणि नॅक प्रोजेक्ट रूम बांधकामाचा शुभारंभ करण्यता आला. कॉलेजचे प्राचार्य डाॅ.अरुण गाडे यांचे मार्गदर्शनानुसार आणि प्रा.ए.कणसे, बापू सावंत, प्रा.यू.आर.माने, सुपुगडे सर, काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने  आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांनी ठरविल्याप्रमाणे झाले. प्राचार्य डाॅ.सतीश घाटगे, राजाभाऊ माने, आनंद साळुंखे, प्रा.सुपूगडे, प्रा बागवान, कंत्राटदार बालाजी इत्यादी मान्यवरांचे हस्ते हा शुभारंभ समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रा.सुरेश यादव, अशोक दिंडे, रमेश मोरे, अरुण शिबे, प्रा.सादळे, प्रा.साळुंखे व अन्य मान्यवर उपस्थित होते.                     या छोटेखानी उदघाटन कार्यक्रमानंतर काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ कार्यकारिणी सदस्य तसेच कॉलेजचे प्राध्यापक यांची बैठक पार पडली. यावेळी काकासाहेब चव्हाण कॉलेजचे माजी प्राचार्य सतीश घाट...

समर्पण फौंडेशनच्या वतीने जिजाऊ वसतीगृहात दिवाळी फराळ वाटप

Image
तळमावले/वार्ताहर भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात.  या दिवाळी सणाचे औचित्य साधत समर्पण फौंडेशनच्या वतीने कोळे ता.कराड येथील जिजाऊ वसतीगृहातील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, सुनील आडावकर, शशिकांत पाटील, विजय पवार, अक्षय भांडवलकर, सुनील भांडवलकर, प्रवीण कदम, महेंद्र चाळके, समीर नदाफ व जिजाऊ वसतीगृहातील अन्य उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम हया या समर्पण फौंडेशनच्या अध्यक्षा आहेत. चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत काम करत असलेल्या कवितायांनी अनाथ मुलांना दिलेल्या फराळ वाटपामुळे त्यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. समर्पण फौंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशाप्रकारचे सामा...

वाडयाची पंचाहत्तरी साजरी करणारे मोरे घराणे.

Image
  तळमावले /वार्ताहर                          आपण राहतो त्या वास्तुप्रती जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी पाटण तालुक्यातील मोरेवाडी (कुठरे) येथील मोरे घराण्याने मोरे वाडयाची पंचाहत्तरी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पाटण तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला या कुटुंबाचा मोऱ्यांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. या कुटुंबातील मूळ पुरुष कै.ज्ञानू संतू मोरे, गेले कित्येक वर्ष झाले हे कुटुंब या मूळ पुरुषाचा पुण्यतिथी सोहळा साजरा करत आले आहे. यावर्षी या पुण्यतिथीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पुण्यतिथीची कीर्तन सेवा गेले कित्येक वर्ष झाले श्री सद्गुरूरावसाहेब महाराज चिखलीकर यांनी केली व यांच्या परंपरेतील कीर्तनकार ही सेवा करत आले आहेत. या पुण्यतिथीची पहिली कीर्तन सेवा श्री सद्गुरू.रावसाहेब महाराज चिखलीकर यांनी बरेच वर्ष सेवा केली त्यांच्या नंतर श्री. सद्गुरू उत्तम महाराज चिखलीकर हे करत आले आणि त्यांच्या नंतर श्री गुरुदेव अच्युत महाराज चिखलीकर हे करत आहेत. आज या परंपरेतील किर्तन सेवेला पण 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अतिशय आन...

पाटणला गुरुवारपासून पोलिस पाटलांचे उपोषण

Image
तळमावले ता.पाटण                 मानधनात वाढ करण्यासह ते महिन्याचे महिन्याला मिळावे यासह इतर विविध मागण्यासाठी येत्या गुरुवारपासून (ता१६) आमरण उपोषण सुरू करत असल्याचे निवेदन पोलिस पाटील संघटनांच्या वतीने देण्यात आले. ढेबेवाडी विभागातील शेंडेवाडीचे पोलिस पाटील संतोष पवार व रामीष्टेवाडीचे पोलिस पाटील बजरंग रामीष्टे आमरण उपोषण करणार असून पाटण तालुक्यातील पोलिस पाटील साखळी उपोषनाने त्यात सहभाग नोंदविणार आहेत.             निवेदनातील माहिती अशी,पोलिस पाटलांचे मानधन वाढवावे यासह इतर प्रलंबित मागण्या संदर्भात वारंवार निवेदने देवूनही सध्याचे सरकार त्याचा गांभीर्याने विचार करत नाही.सध्याचे तुटपुंजे ६५०० मानधन नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत कधीच वेळेत महिन्याच्या महिन्याला मिळालेले नाही. तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह,मुलांचे शिक्षण याचा मेळ बसत नाही गेल्या सहा महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही.दिवाळी साजरी करणेही अवघड झाले आहे.याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दुपारपासून आम्ही पाटण येथे प्...

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी मरळी येथे रंगणार ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’

Image
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी दौलतनगर-मरळी येथे सायंकाळी ६ वाजता ‘शंभूदौलत जल्लोष २०२३’ या भव्य संगीतरजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राचे लाडके कलाकार पाटणवासीयांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधत गाणी, नृत्य, पारंपरिक लावणी व विनोदी कार्यक्रमांच्या माध्यमातून अनोखी कलामैफल संपन्न होणार आहे.  यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, तसेच सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, रोहित माने हे कलाकार आपल्या प्रहसनांमधून हास्यविनोदाचे कारंजे उडवणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, स्मिता शेवाळे, कृतिका गायकवाड आणि अभिनेता शुभंकर तावडे हे विशेष नृत्ये सादर करणार आहेत. यावेळी लावणी नृत्यांगना अर्चना जवळेकर, प्राची मुंबईकर, नमिता पाटील, अदित...

ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य आणा

Image
  दौलतनगर दि . 11   :-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख , पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो . यंदा त्यांचा  5 7   वा वाढदिवस शुक्रवार दि .17  नोव्हेंबर , 2023  रोजी दौलतनगर ता . पाटण येथे मोठया दिमाखात साजरा करण्याचे नियोजित आहे .  वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल , श्रीफळ , फेटा देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत :  नामदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून त्यांचे दि.17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसानिमित्त भेट देताना पुष्पगुच्छ , हारतुरे न आणता मतदार संघातील   गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिव...

अनाथ बालकांना सुखाचा घास देऊन साईशा कोळेकर चा वाढदिवस साजरा

Image
तळमावले/वार्ताहर                आधार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ महादेव कोळेकर यांच्या साईशा या मुलीचा पहिला वाढदिवस दिघा नवी मुंबई येथील प्रिसकिल्ला चिल्ड्रन्स होम (फ्रेण्डशिप सेंटर) या अनाथ आश्रम मधील मुलांना जेवण देत साजरा केला. याप्रसंगी आधार फाऊंडेशन चे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.                 "मोठंमोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे  आशिर्वाद मिळतील. आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे. या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदत रुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहोत. आजपर्यंत आधार फाऊंडेशन च्या माध्यमातून अनाथ आश्रम, वृध्द आश्रम खेडेगावातील शाळा व विधवा आधार नसलेल्या महिलांसाठी कार्यक्रम रा...

पाटण तालुक्यातील २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा

Image
पाटण /वार्ताहर                पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निवडणूक झालेल्या एकूण १७ पैकी ११ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी शिवसेना पक्षाच्या बाजूने कौल दिला असून या निवडणुकीआधी ९ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची बिनविरोध सत्ता स्थापन झाली आहे. पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीत एकूण २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.           पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे शिवसेना-देसाई गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. एकूण २६ पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी शिवसेनेच्या बाजूने निर्विवाद कौल दिला आहे. निवडणुकीआधीच गमेवाडी, गुंजाळी, उधवणे, नवसरवाडी, येराडवाडी, डावरी, चौगुलेवाडी सांगवड, गव्हाणवाडी, निवी या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना-देसाई गटाची बिनविरोध सत्ता स्थापन झाली आहे. रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी उर्वरित १७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात १७ पैकी कळक...

कालेचे विकास पाटील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सेवा पुरस्काराने सन्मानित

Image
काले/वार्ताहर                महात्मा गांधी विद्यालय कालेचे स्कूल कमिटी सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विकास पाटील हे शाळेची इमारत उभारण्यासाठी करत असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सेवा पुरस्काराने सिक्कीम चे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, माहिती तंत्रज्ञान विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा रचनाताई पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, यशवंत नगरी न्युज चॅनेल चे संपादक विकास भोसले, कार्यकारी संपादक स्वाती भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.              विकास पाटील यांनी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या विचारांचा पाईक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जन्मभूमीत व कर्मवीरांच्या कर्मभूमीत गेल्या 11 वर्षापासून गावा मध्ये शैक्षणिक चळवळ उभी केली आणि शाळा माऊलीच्या नूतन इमारतीच्या जागेपणी पाहिलेल्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने 2018 ला यश यायला सुरुवात झाली.     ...