Posts

Showing posts from June, 2024

एक वही,एक पेन शिवतेज ग्रामस्थ मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळा चा विधायक उपक्रम

Image
                    राजापूर : तालुक्यातील नाटे गावातील शिवतेज ग्रामस्थ  मंडळ पोकलेवाडी - नाटे मंडळ गेली कित्तेक वर्षे कला, क्रिडा, सांस्कृतिक,क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या विभागात दरवर्षी  लोकपयोगी,नाविन्यपूर्ण विधायक उपक्रम हे मंडळ यशस्वी पणे राबवीत असते.                     गेल्या वर्षभरात मंडळाने महिलांसाठी सेनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण,शालेय मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप,मोफत छ्त्री वाटप,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,दिवाळीत प्रत्येक घरात  रांगोळी साहित्याचे मोफत वितरण,वृक्षारोपण,न्यानाची शिदोरी हा शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम,लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा यांसारखे विधायक उपक्रम राबवण्यात आले.                     मंडळाचा विधायक कामाचा आलेख खूप मोठा व अभिमानास्पद आहे.विभागातील शेकडो ग्रामस्थांच्या डोळ्यांचे मोफत मोतीबिंदूचे तपासणी शिबिरे भरवून मोतीबिंदूचे निदान झाले त्यांचे मोफत ऑपरेशन कर...

शिक्षकाने गुणवान विद्यार्थी घडविणे हे खरे पुण्यकर्म असते - प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

Image
तळमावले/वार्ताहर                     श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे काकासाहेब चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून, २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने बुधवार दि. २६ जून, २०२४ रोजी सकाळी १०.३० वा.  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांचा सेवा गौरव व 'मी वादळ वारा' गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.                      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली.  समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ (सहसचिव (प्रशासन), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सुप्रसिद्ध व्याख्याते व विचारवंत) उपस्थित होते. या समारंभासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. एस. के. कुंभार (माजी सहसचिव (...

विशाल सुहास कुंभार याचा वाढदिवस वहया वाटप करून साजरा

Image
कुठरे/सुनील पवार यांचेकडून         कुठरे ता . पाटण येथील NESK माजी विद्यार्थी संघाचे सदस्य तसेच मुंबई येथील लघु उद्योजक श्री.सुहास आनंदराव कुंभार यांनी त्यांचा मुलगा विशाल याचा वाढदिवस अंगणवाडी शाळा क्रमांक  १ / २  मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य शिशपेन्सील , वॉटर कलर , पेन्सील कलर  कोरे A- 4  पेपर देऊन तर जि.प. प्राथमिक  शाळा , कुठरे शाळेतील इ.१ ली ते ४ थी मधील सर्व मुलांना तसेच न्यू इंग्लिश स्कूल , कुठरे हायस्कूल मधील इ.५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थ्यांना वहया वाटप करुन साजरा केला .              वाढदिवस म्हणजे आनंददायी दिवस . यादिवशी आनंद घ्यायचा असतो तसाच आनंद इतरांना सुद्धा दयायचा असतो . हा आनंद द्विगणीत करण्याकरिता कुंभार परिवारांनी शाळेतील मुलांना वहया वाटप करुन विशालचा  वाढदिवस आनंदात साजरा केला . यापूर्वी सुहास कुंभार यांनी  इ .५ वी मधील ३५ मुलांना स्कूल बॅग वाटप केल्या होत्या .               याप्रसंगी हायस्कुलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ . कविता पा...

मानवी जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व - श्री.पी.एल.केंडे

Image
पाटण-                 मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आज 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर यांनी मानवी जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आहे, असे मत योग दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात आपले शरीर, आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी  नियमीत व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.                या योग वर्गासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील उपशिक्षक श्री.एस.एल.डोंगरे, श्री.एस.व्ही.भिसे, श्री.एस.डी कुंभार  यांनी योगाचे महत्व, फायदे तसेच योगाची गरज याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या योग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम यांनी केले, तर आभार कु.मणेर एस.एस.यांनी मानले. या  योग वर्गासाठ...

महात्मा गांधी विद्यालयात नवागताचे वाजत गाजत स्वागत

Image
पाचवड,दिनांक,15 जून 2024            विद्यालय सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून वाजत गाजत स्वागत करीत विद्यालयात आणले,त्यांचे स्कूल कमिटी चे सदस्य श्री.भरत गायकवाड दादा श्री.प्रकाश पारखे दादा तसेच प्राचार्य सौ.मुल्ला एन.एस.यांनी गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून स्वागत केले.            पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण केले.याच कार्यक्रमात विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.कचरे बाळासाहेब यांचाही रोटरी क्लब चा उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून नेशंन बिल्डर पुरस्कार  मिळाल्या प्रीत्यर्थ विद्यालय तर्फे सत्कार केला.विद्यालयातील कामसू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ठ कामा बद्दल गौरविण्यात असले.        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाटोळे साधना यांनी केले प्रास्ताविक श्री.खरात सर यांनी केले.प्राचार्य सौ .मुल्ला एन.ए.यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या,आभार प्रदर्शन हे सौ.पद्मिनी मोकाशी मॅडम यांनी केले.सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी हा...

म्हातोबाचा माळ साठी लेखक सत्यवान मंडलिक यांना साहित्य भूषण पुरस्कार

Image
प्रतिनिधी- ठाणे                         अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळी जीवन गौरव, समाज भूषण, विद्या भूषण, साहित्य भूषण असे पुरस्कार देऊन अनेक प्रतिभावंत मान्यवरांना गौरवण्यात आले.                     लोकप्रिय लेखक/कवी सत्यवान मंडलिक यांच्या विविधांगी साहित्य लेखनामधून साकार झालेला 'म्हातोबाचा माळ' हा ग्रामीण कथासंग्रह मागील वर्षी पुण्यातील ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र पब्लिकेशन व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्य संयोजक आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय विक्रम अडसूळ यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने पार पडला होता. त्या पुस्तकास अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने निवड केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ साठी 'सावित्रीबाई फुले साहित्य भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यि...

शेतकऱ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे आभार

Image
तळमावले/वार्ताहर                 राज्यामध्ये मान्सुन पावसाने प्रवेश  केला असला तरी विभागामध्ये अजून पावसाळयापूर्वीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे साठवण आणि खरेदीसाठी कामाला लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी उन्नती योजना अंतर्गत सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी ढेबेवाडी येथे 100 क्विंटल सोयाबीन वान केडीएस 726 (फुले संगम) ढेबेवाडी विभागातील शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येत आहे. 30 कीलो पॅकींग 2400/- रुपये अनुदान रक्कम 600/- रुपये वगळता शेतकऱ्यांना 1800/- रुपये प्रमाणे बियाणे वाटप करण्यात येत आहे. ढेबेवाडी येथील दिग्विजय कृषी सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ ढेबेवाडी आणि तळमावले येथील श्री वडजाई कृषी सेवा केंद्रामध्ये ही बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.                 पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करण्यात येत आहे. दरम्यान...

पहिला विमान प्रवास

Image
                     मनुष्य जन्माला आला की  त्याचा सटवाई ने लिललेला प्रवास सुरू होतो. पाचवी व बाराव्या दिवशी बारसं झालं की "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" या म्हणी प्रमाणे चार साडेचार वर्षे झाली की शाळेचा "श्री गणेशा" असा आपला जीवन प्रवास सुरू होतो. शाळा, काॅलेज, डिग्री पदवी, डिप्लोमा कोर्स पूर्ण केला की नोकरी, मग ती सरकारी असो, खाजगी किंवा शेती व्यवसाय किंवा एखाद्या कंपनी मध्ये माणूस स्थिरस्थावर झाल्यावर दोना चे चार हात केले की माणूस आपल्या आयुष्यात सेटल होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा ठरलेला असतो. आपल्या प्रारब्धानुसार  आपला जीवन प्रवास सुरू असतो.             आयुष्याची तिस वर्षे महानगरी मुंबई येथे व्यतीत केली आहेत. या नगरीची सर्वांना भुरळ पडते. रंका पासून रावापर्यंत इथे सर्व गुण्यागोविंदाने नांदतात. हाताला काम मिळाले की जो तो या नगरीचा भार होऊन जातो. ही नगरी त्याला सोडवत नाही. जो इथं पोट भरू शकत नाही तो  इतर ठिकाणी ही पोट भरू शकत नाही असा माझा कयास आहे. ...

विक्रमसिंह देसाई यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Image
पुणे/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा                     शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे यांचेवतीने  शिक्षण क्षेत्रातील भरीव व उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पहिलाच शैक्षणिक सेवागौरव राज्यस्तरीय पुरस्कार रयत बँकेचे संचालक व न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनि. कॉलेज, काळगाव शाखेचे लिपीक विक्रमसिंह तानाजीराव देसाई यांना दि. 01 जून 2024 रोजी पुणे या ठिकाणी आयोजित समारंभात श्रीमती अश्विनी कदम मा. चेअरमन पुणे महापालिका स्टँडिंग कमिटी, श्री. काकासो चव्हाण नगरसेवक, पुणे महापालिका, सचिन दोडके नगरसेवक, पुणे महापालिका, चौधरी साहेब शिक्षणाधिकारी पुणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, शिक्षकेत्तर राज्य महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.                      या कार्यक्रमासाठी सातारा शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष  रमेश इंगवले  सचिव इम्रान मुल्ला, पाटण तालुका अध्यक्ष अमीर मुलाणी, मुख्याध्यापक अनिल कांबळे, भरत कुंभार, हणमंत भं...

प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Image
तळमावले/वार्ताहर विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड या पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कार सोहळयाचे हे सहावे वर्ष आहे. याच कार्यक्रमात स्पंदन जीवन गौरव, दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक इत्यादींचाही सन्मान केला जाणार आहे. डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून...