तारा @वाल्मिक.COM
नितीन बेलागडे ढेबेवाडी यांचेकडून ताडोबाच्या अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली परीसरात सोडण्यात आलेली तारा आता चांदोली धरणाच्या जलाशय ओलांडून थेट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाल्मिक पठारावर दाखल झाली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून वाघ हा रोज किमान 10 ते 32 किमी अंतर पार करत असतो. अशी माहिती समोर येत आहे त्यामुळेढे बेवाडी विभागात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे असुन ग्रामीण भागातील लोकांची सहाच्या आत घरी पोहचण्यासाठी घाई गडबड दिसत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कमि झालेली वाघांची संख्या वाढविण्यासाठी वन्यजीव विभागाने ताडोबा च्या अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली तारा वाघीण 18 डिसेंबर रोजी पहाटे विलघ्न वासाच्या पिंजऱ्यातुन बाहेर पडल्यानंतर ताराने सोनारलीचे पठार गाठले तिथे दिवसभर बसून राहिल्या नंतर 19डिसेंबर रोजी ती पठारावर वरून खाली चांदोली धरणाच्या बॅकवॉटरच्या दिशेने चालू लागली बॅकवॉटर च्या भागात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ती दिवसभर बसून राहिली. यावेळी ती धरणाच्या पलीकडील दिसनारा भाग निरखून पाहत होती. धरण...