ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा ५० वा वाढदिवस संपन्न
नवी मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, माजी आमदार व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा ५० वा वाढदिवस दि. २२ जानेवारी रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवीमुंबई याठिकाणी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री मा.ना.गणेशजी नाईक, माजी मंत्री व युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. भारतीताई पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, नरेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी व प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील आदी मान्यवर आणि माथाडी कामगार-कार्यकर्ते, हितचिंतक ...