Posts

Showing posts from March, 2024

शालेय स्पर्धा परीक्षामध्ये कु. आराध्या कदम राज्यात द्वितीय

Image
               पाटण - मोरणा शिक्षण संस्थेच्या वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर या विद्यालयातील इयत्ता 4 वी मध्ये शिकणारी कु.आराध्या प्रकाश कदम  या विद्यार्थ्यांनीने भारती विद्यापीठ पुणे परीक्षा विभाग यांच्या वतीने शालेय स्पर्धा परीक्षामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख 1000/- रू. देवून तिचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे, यासाठी तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.सुमित देसाई सर सर,सौ.जंगम,सौ.गव्हाणे मॅडम, सौ.रेश्मा पाटील मॅडम, सौ.जाधव मॅडम, सौ.चोपदार मॅडम, सौ.उदुगडे, सौ.पवार मॅडम यांचे विशेष  मार्गदर्शन लाभले.                या दैदिप्यमान यशाबद्दल कु.आराध्या प्रकाश कदम या विद्यार्थिनीचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री.डी....

वांग मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरतोय

Image
नितीन बेलागडे/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा                कराड पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांन साठी वरदान ठरलेले वांग मराठवाडी धरण ह्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून वांग मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरत असुन धरणं परीसरातिल छोटे मोठे व्यवसायांन तेजी प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.                 एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल  दुसऱ्या बाजूला पवन ऊर्जा कंपनी ची गरगर फिरणारी पाती आणि निसर्गाच्या कोंदणात साकारलेलं वांग मराठवाडी धरण ह्या धरणाच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत 1997 साली सुरवात झाली. पुढे अनेक वर्षे वेगवेगळ्या कारणांनी धरणाचे काम रखडत गेले. कधी धरणग्रस्तांची आंदोलने तर कधी निधीचा तुटवडा ह्या मुळे धरणाच्या कामाला कधी गती मिळालीच नाही. 2012 पासून धरणांच्या जलाशयात थोडा फार पाणी साठा करण्यासाठी सुरुवात केली मात्र धरणाचे काम अपूर्णच होते. पुढे वांग मराठ...

पत्रकार भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची एस ई ओ पदी नियुक्ती

Image
प्रतिनिधी - धारावीतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले व धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक श्री भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची महाराष्ट्र शासनाच्या मुंबई शहर विभागासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती  शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.   भिमराव धुळप हे नुसते पत्रकारिता न करता सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात  उल्लेखनीय असे कार्य करत आहेत.अनाथाश्रम,वृद्धाश्रम, आदिवासी पाडा येथील गरजूंना मदत,ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैधकिय सहाय्यता निधी मिळवून देणे, त्यांना रुग्णालय उपलब्ध करणे (आरोग्यदूत म्हणून काम), दिव्यांगांना मदत असे कार्य चालूच आहे, या गोष्टीची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. आतापर्यंत त्यांना २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ७५० हुन अधिक रुग्णांना मदत केली आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खा.राहुल शेवाळे यांनी शिफारस करून पालकमंत्री  दीपक केससकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांन...

डॉ. सोमनाथ गिते यांना "राज्यस्तरीय समाजरत्न" पुरस्काराने सन्मानित

Image
पुणे – पुणे येथील राज्यस्तरीय सामाजिक काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणारे स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड , श्री.दत्ता कोहिनकर – माईंड पॉवर ट्रेनर, मा. रेखा खोपकर – मा.नगरसेविका ठाणे, मा. रुपाली जाधव – संचालिका सवाई मसाले, मा. पौर्णिमा राऊत – एक्स टेलर, मा. तेजस्विनी पायगुडे – अभिनेत्री, मा. आनंद पिपळकर, डॉ.राजेंद्र भवाळकर, डॉ. सोमनाथ गिते आदी मान्यवर उपस्थित होते.           माननीय श्री. राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय सौ.शोभाताई बल्लाळ संचालिका स्वप्नल फाऊंडेशन यांनी केले. वंदना साळोखे यांच्या ...

संगीतकार महेश मस्कर, गायिका साक्षी कोकाटे आणि अभीर शेलार यांच्या आवाजातील 'माझी एकवीरा माऊली' गाण प्रदर्शित

Image
तळमावले/वार्ताहर                  संगीतकार महेश मस्कर याने अप्रतिम अस लिहिलेल 'माझी एकवीरा माऊली' हे गाण प्रदर्शित झाल आहे. महेश मस्कर याच संगीतकार म्हणून हे तिसर गाण आहे. नेहमी प्रमाणे महेश मस्कर याने नवोदित कलाकाराना आपल्या गाण्यामध्ये संधी दिली आहे.नवोदित कलाकारांना असे व्यासपीठ तयार करून देणारा हा पहिला युवा दिग्दर्शक आहे. 'माझी एकवीरा माऊली' या त्याच्या गाण्यामध्ये महेश मस्कर याने वैष्णवी मस्कर, वैशाली भोसले, प्रेरणा मोरे, भूमिका मस्कर, अनिकेत बनायित या नवोदित कलाकाराना संधी दिली आहे.        गायिका साक्षी कोकाटे आणि गायक अभीर शेलार यांच्या गोड आवाजामधील हे गाण महेश मस्कर याने संगीतबद्ध केल.साक्षी आणि अभीर या दोघानी कमालीच गाण गायल आहे.गाण्याचे सुंदर अस संगीत संयोजन कृपेश पाटील यानी केल आहे.आणि अलंकार गोपाळे याने छायाचित्रण केल आहे.त्याच बरोबर या गाण्याविषयी बोलताना महेश मस्कर याने असे सांगितले की,मी आई दुर्गा माते ला खुप मनातो.आम्ही आमच्या गावी नवरात्र उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतो.तर माऊली वरती काहीतरी प...

येवती येथील बौद्धजन हितवर्धक संघाची पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका

Image
             उंडाळे (प्रतिनिधी) येवती ता.कराड येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी जाणवत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई यांच्या वतीने कैलास सोरटे, अशोक सोरटे यांच्यासह ग्रामस्थांनी कराडचे तहसीलदार व प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सदरच्या येवती गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा.                    अन्यथा 18  मार्चपासून  कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चा इशारा देण्यात आला आहे. येवती येथे जलजीवन मिशनच्या वतीने 1 कोटी 38 लाखाची योजना सध्या येवती मध्ये सुरू आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून ही योजना का थांबली. याची माहिती मिळावी व ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी बौद्धजन हितवर्धक संघ  वतीने  करण्यात आली. सदर योजना खूप दिवस झाले रखडल्यामुळे गावचा पाणी पाणी प्रश्न भेडसावत आहे.                     मागील वर्षी दे...

रामिष्टेवाडी च्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - संजय आंबुळकर

Image
 काळगाव/ संदिप सावंत       रामिष्टेवाडी ते भरेवाडी पोच रस्त्याच्या सुधारणा डोंगरी विकास आराखडा 2023/ 24 कामांचा उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंजाबराव देसाई, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास गोडांबे, अनिल शिंदे, संजय आंबुळकर, बबन शिखरे, नामदेव रामिष्टे, मारुती शिखरे, अनिल काळे, मारुती सावंत, गोविंद गोटुगडे, उपसरपंच बबन शिखरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.           संजय आंबुळकर म्हणाले की, ग्रामपंचायत रामिष्टेवाडी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या गटांमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे.              रामिष्टेवाडी  ते भरेवाडी हा पोच रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता त्यासाठी तात्काळ निधी मंजुरी मिळाला असून त्याच्या कामाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ होत आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या रस्त्यावर वरुन वाहतूक करत असताना रस्ता खराब असल्यामुळे प्रचंड वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता तशीच अपघाताचेही प्रमाण वाढली होते. मंत्री शंभूराज...

स्वकल्पनांना शब्दबद्ध करणारी मुलं भविष्यातील समृद्ध नागरिक असतील : दीपा बोरकर

Image
पाटण/वार्ताहर                     सातारा जिल्ह्याचे कोकण वाटावे  ..इतका हिरवाईचा प्रसन्न तालुका ! तारळी, कोयना आणि वांग या तीन नद्यांनी लाडावून नटवलेला  समृद्ध, निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेला तालुका. पावसाळ्यात कडेपठारांवरुन हजारो मोठमोठे नाले, धबधबे अंगाखांद्यावर खेळवणारा देखणा तालुका. या तालुक्यातील कोयनेच्या काठावरची शाळा, जिल्हा परिषद शाळा मुळगाव. जिल्हा परिषद शाळा मुळगाव या शाळेतील संवेदनशील लेकरांनी लिहिलेल्या या सुंदर गोष्टी. या पुस्तकाची बीजं पेरली होती श्री.सदानंद कदम, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक यांनी पाटण तालुक्यात शिक्षकांसाठी घेतलेल्या कार्यशाळेतून. अविश्वसनीय इतका सूक्ष्म अभ्यास, ज्यांच्या अक्षरांपुढे मोतीही थोडे कमी देखणे वाटावेत इतके  सुंदर हस्ताक्षर आणि तितकाचं प्रचंड इतिहासाचा व्यासंग. या कार्यशाळेने आम्हाला संपन्न  तर केलेचं परंतु आपण कुठे आहोत याची लख्ख जाणीवही झाली. सुंदर हस्ताक्षर आणि शुद्धलेखन यासाठी पाटण तालुक्यातील निवडक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली आणि एक गोष्ट लक...

जिल्हाधिकाऱ्यानी केला शेतीमित्र पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर                सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि पत्रकार यांचा किसान उत्सव दिनाचे औचित्य साधत शाल, श्रीफळ, आंब्याचे रोपटे आणि कोल्हापूरी फेटा देवून सन्मान केला. जिल्हाधिकारी डुडी यांच्यासमवेत यावेळी सातारा जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे व अन्य कृषी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कौतुक सोहळयाचे आयोजन केले होते.                महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह  एका कृषी सहायक व पत्रकार यांचा समावेश आहे.           यामध्ये वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार 2020 (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) नितीन बाजीराव वरखडे (रा.वरखडवाडी, ता.वाई), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) अधिक मारुती माने (मानेगा...