रघुनाथ रामचंद्र माटेकर यांचे निधन

तळमावले/वार्ताहर

            चिखलेवाडी (ता.पाटण) येथील रघुनाथ रामचंद्र माटेकर यांचे गुरुवार दि.13 मार्च, 2025 रोजी निधन झाले. आप्पा या नावाने ते परिसरात परिचित होते. पाटण तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आणि चिखलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे ते कट्टर समर्थक होत. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

            त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. 22 मार्च, 2025 रोजी तर उत्तरक्रिया विधी मंगळवार दि.25 मार्च, 2025 रोजी मु.पो.चिखलेवाडी, ता.पाटण, जि.सातारा येथे होणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न