गावोगावी ग्रंथालय चळवळ निर्माण होणे आवश्यक : प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे
कराड (प्रतिनिधी) : ग्रंथालय हे ज्ञान व माहितीचे वहन करणारा महत्त्वपूर्ण स्रोत आहे.सामाजिक जागृतीमध्ये ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण असून गावोगावी ग्रंथालय चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे यांनी केले. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य घाटगे पुढे म्हणाले की, स्वामी रंगनाथन यांच्या मते ग्रंथ हे वाचण्यासाठी असतात, प्रत्येक वाचकांसाठी पुस्तके असतात. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो आणि प्रत्येक ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. तसेच ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे. ही ग्रंथालयासाठी सर्वसमावेशक पंचसूत्री तयार केली आणि ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला. तसेच ग्रंथालय चळवळी मधून अनेक प्रतिभावंत साहित्यिक निर्माण झालेले असून माहिती...