Posts

Showing posts from May, 2024

स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

Image
  तळमावले/वार्ताहर                 पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात येतो. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ देवून गौरविण्यात येते. सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे.                 सन 2023 व 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्य कलाकृती यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, चारोळीसंग्रह, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र, आत्मचरित्र व संकीर्ण विभागातील साहित्य कलाकृतींचा समावेश केला जाईल. पुरस्कारासाठी प्रस्तावासोबत आपल्या साहित्य कलाकृतीच्या तीन प्रती, दोन आयडेंटी फोटो, अल्प परिचय पाठवावा. पाठवलेल्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा मजूकर लि...

माजी विद्यार्थी महाविद्यालयाची शान आहेत : राजाभाऊ माने

Image
तळमावले/वार्ताहर माजी विद्यार्थी महाविद्यालयाची शान आहेत. रविवार दिनांक 19 मे, 2024 रोजी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या 2008 मधील बी.कॉम तीन या वर्गाने स्वतंत्र मेळावा आयोजित केला. महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावे कॉलेज आयोजित करते. परंतू 2008 बी.कॉम.3 च्या बॅचने स्व खर्चाने  मैत्रीचा स्नेहमेळावा आयोजित करून काॅलेजमध्ये इतिहास घडवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. काकासाहेब चव्हाण कॉलेज ही माझी दुसरी माता असून तिच्या विकासासाठी आम्ही माजी विद्यार्थी संघ व आपण सर्वजण मिळून जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया व महाविद्यालयाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहूया असे आवाहन काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ माने विद्यार्थ्यांना  केले. याप्रसंगी प्राध्यापक ए.बी.कणसे, डॉ.यु.ई.साळुंखे. वसंतराव हारुगडे उपस्थित होते. ‘‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी आपणाला शिक्षणाची गंगोत्री आपल्या घरापर्यंत दिली म्हणूनच तुम्ही आम्ही आज विविध पदावर आनंदात ताठ मानेने कार्यरत आहोत. या महाविद्यालयाची उतराई म्हणून आपण दहा हजार रुपयाची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिलीत. या...

वाईच्या गोरे दांपत्याचे पाणीदार गावांसाठी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदान

Image
              वाई/प्रतिनिधी                 मूळचे दुष्काळग्रस्त माण तालुक्याची जन्मभूमी आणि वाई तालुका कर्मभूमी असलेले सौ.अनिता व गोरखनाथ गोरे हे वाई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बारा महिने दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असलेल्या या दांपत्याला पाणी डोळ्यात पाणी आणते हा अनुभव पाठीशी असल्याने वेळे भिलारवाडी येथे शासन, नाम फाउंडेशन,ज्ञानदीप परिवार व दानशूर दात्याच्या अर्थसहाय्यातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाणीदार गाव करण्यासाठी गेली २४ दिवस दुष्काळाचा पिच्छा सोडवण्यासाठी श्रमदान करत असल्याची माहिती समाजमध्यातून वाचनात आल्यावर गोरे दांपत्याने सामजिकतेचे भान ठेवत सामाजिक बांधिलकी म्हणून या कामात योगदान देण्याचा निश्चय केला.            खरंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यात लोक मग्न असतात आणि गोरे दाम्पत्य इकडे श्रमदानातून पाणीदार गाव करण्यासाठी आपले योगदान देतात ही या दांपत्याची आगळीवेगळी सामाजिक बांधिलकीची जाणीवच म्हणावी लागेल.    ...

ढेबेवाडी येथील श्री लक्ष्मीदेवी (मरीआई) यात्रा विशेषांक

Image
 

चंद्रकांत चाळके यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) चे सुपुत्र चंद्रकांत चाळके यांची नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत चाळके यांची पाटण तालुका संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच गावातील लोकांचा शिवसेना पक्षात प्रवेश करत असून विकास निधी आणण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. पक्षाची कामे  जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल चाळकेवाडी ग्रामस्थांनी मायभूमीत त्यांचे जल्लोषी स्वागत केले आहे. याप्रसंगी सरपंच अशोक चाळके, शाखाप्रमुख मारुती निवडूंगे, राजेंद्र चाळके, धनाजी चाळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रकांत चाळके यांच्या वाटचालीचा आढावा घेणारा लेख... आपल्या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाने समाजमनावर आपली कर्तृत्व...

आपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानाने भारावली डाकेवाडीकरांची मने

Image
तळमावले/वार्ताहर सलग दोन वर्ष फक्त आणि फक्त गावच्या मंदिराच्या पुर्णत्वाचा ध्यास, अहोरात्र त्याचाच विचार, त्यासाठी श्रमदान करणाऱ्या डाकेवाडीतील हातांचा हृदय सन्मान शिवसमर्थ परिवाराच्या वतीने अॅड.जनार्दन बोत्रे आणि त्यांचे सहकारी यांनी केला. या आपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानाने श्री दत्त मंदिर डाकेवाडी जीर्णोध्दार समितीचे सदस्य आणि या समितीला सहकार्य करणारे गावातील ग्रामस्थ या सर्वांना श्रीफळ, टाॅवेल-टोपी आणि पोषाख देण्यात आला. याप्रसंगी अनिल डाकवे, नानासाहेब सावंत, नितीन पाटील, आबासाहेब शिबे, रेश्मा डाकवे, भारतीताई डाकवे, अनुसया डाकवे, आबासाहेब शिबे, डाॅ.संदीप डाकवे,  किरण सावंत, संदीप सावंत-फौजी, अंकुश सावंत  व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.  प्रारंभी हा कार्यक्रम घेण्यापाठीमागची भूमिका डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रास्ताविकातून मांडली. यावेळी शिवसमर्थ परिवाराचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांनीही ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले, ‘‘गाव एकत्र असेल तर काय होवू शकते याचा आदर्श आज डाकेवाडीने इतर गावांसमोर ठेवला आहे. डोंगर विभागातील लोकांनी आपल्या प्रगतीसाठी ...

हॅलो, मी काळगांवची शाळा बोलतेय...!

Image
 मी काळगांवची शाळा बोलतेय...!"                      हे ऐकून आपण दचकला असाल पण मलाही भावना आहेत. बुधवार दि.24 एप्रिल, 2024 रोजी आपल्या काळगांव विभागात झालेल्या वादळी पावसाने माझे होत्याचे नव्हते झाले. वादळामुळे माझ्या काळजात धस्स झाले. नशीब माझ्या लेकरांना सुट्टी होती. ती माझ्याजवळ असते तर काय झाले असते या विचाराने माझा जीव जीव थाऱ्यावर नाही राहिला. मला एकटेपणाची अजिबात सवय नाही. मार्च, एप्रिल, मे महिन्यात मुलांच्या परीक्षा झाल्या की त्यांची गर्दी हळूहळू कमी व्हायची. त्यावेळी मी बैचेन व्हायची. मला कायम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात राहायाची सवय. मुलांना समजू लागल्यापासून ते काॅलेजमध्ये जाईपर्यंत ती माझ्याच सहवासात असायची. त्यांच्या अडीअडचणी, दुःखे, आनंद सर्व गोष्टी मला समजायच्या. दिवाळीच्या सुट्टीत किंवा उन्हाळयाच्या सुट्टीत विद्यार्थी येत नसायची तर मला अजिबात करमत नसे. कित्येक मुलांनी घरच्या अडचणीमुळे माझ्यापासून नाईलाजाने दुरावत नोकरी कामधंदा करण्यास सुरुवात केली. कित्येक त्यातून शिकून मोठया पदावर गेली. अन...

वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शाळेसाठी मदतीसाठी आवाहन

Image
तळमावले/वार्ताहर                बुधवार दि.20 एप्रिल, 2024, रोजी झालेल्या वादळी पावसामुळे काळगावातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला सर्वाधिक हानी पोहोचली असून शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले आहे. ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोग शाळेतील उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.              पन्नास वर्षांपूर्वी गावाच्या आजूबाजूला दहा किलोमीटर परिसरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसल्याने रयत शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली. सध्या या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी (विज्ञान) पर्यंतच्या 230 विद्याथ्र्यांना शिक्षण दिले जाते. ही शाळा पावसाळा सुरू होण्याअगोदर पूर्ववत होणे आवश्यक असून त्यासाठी अंदाजे रु. 18 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.            या घटनेनंतर ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी आपापल्या परीने शाळेला मदत देवू केली आहे. परंतु अवकाळी पावसाने होवू शकणारे अधिकचे नुकसान टाळण्...

शिष्यवृत्ती परीक्षेत मठाचीवाडी जि. प. शाळेची यशाची परंपरा कायम

Image
मठाचीवाडी ( ता. फलटण ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मठाचीवाडी हे गाव एक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते. गावकऱ्यांच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने झालेला शैक्षणिक उठाव आणि येथील शिक्षकांच्या अथक परिश्रमाने या शाळेची गुणवत्ता आणि खेळातील यश देखील वाखानण्याजोगे आहे. 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आणि तब्बल 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. यामध्ये संचित जाधव, स्वामिनी लामकाने, शिवम पवार, वेदांत कन्हेरकर, श्रावणी भंडलकर, तेजस काळे, आदित्य शेलार, विश्वजीत चिखलठाणे, शरयू पिसाळ, वेदांत कदम, स्वराजसिंह कांबळे आणि अर्जुन भोसले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच यावर्षी झालेल्या मंथन, बीडीएस आणि IAS अभिरूप परीक्षेमध्ये मनस्वी नायकोडे,स्वरांजली भोसले, धनराज भोसले या विद्यार्थ्यांनी जिल्हा-राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्याचप्रमाणे  स्व. यशवंतराव चव्हाण बाल ...