Posts

Showing posts from December, 2023

काळगाव विद्यालयाची क्षेत्रभेट

Image
          तळमावले/वार्ताहर                     न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज काळगाव विद्यालयाची क्षेत्रभेट मंगळवार दि.12/12/ 2023 रोजी आयोजित करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कांबळे ए.पी.सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते. इ.5 वी ते 12 वी अखेर 130 विद्यार्थी व 10 शिक्षक सहभागी होते. क्षेत्रभेटीसाठी निसर्ग पर्यटन केंद्र भोसगाव, साई गुळ प्रक्रिया केंद्र चचेगाव व सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड ही ठिकाणी निवडण्यात आली होती. तसेच 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी वाल्मिक विद्यामंदिर तळमावले या ठिकाणी ही भेट देण्यात आली.                  सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड या ठिकाणी सुरू असलेल्या व्यावसायिक कोर्सेसची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट,लेडीज पार्लर,फॅशन डिझाइनिंग, जेन्टस पार्लर, बँकिंग अशा विविध कोर्सेस ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.महाविद्य...

विज्ञान प्रदर्शन हे शालेय वयातच संशोधनाची प्रेरणा देतात : श्रीराम साळुंखे

Image
तळमावले/वार्ताहर                जिज्ञासा,चिकित्सक वृत्ती व सृजनशीलतेला शालेय वयातच  शालेय स्तरावर हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि विद्यार्थ्यांनी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन कारणांचा शोध घ्यावा व कार्यकारणभाव शोधून काढावा आणि एवढ्यावरच न थांबता समाजाच्या भल्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून  'समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ' कसे उपयुक्त आहे हे बालकांना बालवयातच कळाव यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन गरजेचं आहे असे प्रतिपादन श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांनी ५१ व्या पाटण तालुका विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी केले.              साऱ्या ब्रम्हांडात विज्ञानाचे अस्तित्व असून त्याची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय वयातच होत असून त्यांना विचारप्रवर्तक करत आहे हे अशा प्रदर्शनाचे यश म्हंटले पाहिजे.ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी प्रदर्शन पर्वणी ठरले आणि याच्या आयोजनाच्या मिळालेल्या संधीचे सोने गुरुदेव कार्यकर्त्यांनी करून वाल्मिकी विद्यालयाचा नावल...

एक आदर्श विद्यार्थी व मित्र - सी.ए. अनिल यादव

Image
                    39 वर्षापूर्वी 1984 च्या ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात दुष्काळ असलेल्या व विनाअनुदानित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. या महाविद्यालयात अकौंटन्सीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. यावर्षी बीकॉम भाग एक हा वर्ग सुरू झाला होता ,या वर्गात अध्यापन करत असताना अनेक विद्यार्थी अध्ययन करत होते ,परंतु त्यापैकी एक विद्यार्थी एकाग्रतेने काळजीपूर्वक सर्व काही मन लावून ऐकावयाचा तो विद्यार्थी म्हणजे अनिल यादव होय.                          काही माणसे आयुष्यात साखरे सारखी विरघळतात. अनिल यादव हे असेच एक लोभस व्यक्तिमत्व. आपल्या परीने इतरांचे काही भले करावे असा ध्यास घेतलेला एक भला माणूस म्हणजे अनिल यादव होय. चाळीस वर्षांपूर्वी कडेपूर परिसर म्हणजे दुष्काळाचे आगर होय. पण उपजत चिवटपणाचे वरदान लाभलेला हा भाग होय. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे,  माननीय संपतराव देशमुख उर्फ आण्णा, माननीय लालासाहेब यादव उर्फ आबा, माननीय भाऊसाहेब यादव उर्फ भाऊ, आणि ग्रामस...

५१ व्या पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे चांद्रयानाच्या उड्डाणाने उद्घाटन

Image
तळमावले/वार्ताहर                बालवयातच मुलांना विज्ञानाची गोडी लागावी व कर्तृत्वाची उत्तुंग उडी घेता यावी आणि विज्ञानातील अविष्काराचा मानवी जीवनात सकारात्मक परिणाम व्हावा आणि विविध अविष्काराचे मंत्र, तंत्र हे विज्ञानाच्या किमयेत दडले आहे याची जाणीव बालकांना व्हावी यादृष्टीने सातारा जिल्हा परिषद,सातारा व पंचायत समिती, पाटण तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावळे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व डॉ.सौ. प्राची नरेंद्र पाटील यांच्या हस्ते कळ दाबून चांद्रयान प्रतिकृतीच्या उड्डाणाने उदघाटन करण्यात आले.                याप्रसंगी डॉ. प्राची पाटील यांनी विज्ञान म्हणजे काय? हे सोदाहरण स्पष्ट करून ग्रामीण भागात एवढ्या उच्च गुणवत्तेच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन डोळ्याचे पारणे फेडणारे आणि शहरी भागातील शाळांना विचार करायला लावणारे आणि आम्हा शहरवासीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असेच आहे. माझ्याच तालुक्यातील एवढ्या दर्जेदार प्रदर्शनाचे उदघाटन करण्याचा  मान मल...

काकासाहेब चव्हाण कॉलेज मध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर           श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व डॉ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावलेच्या गीतमंच म्हणजे श्री.सुनील राजे व त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी राज्यगीत, संस्था प्रार्थना आणि स्वागत गीतांनी झाली. यावेळी माजी प्राचार्य सुहास साळुंखे, प्राचार्य बी.बी.सावंत, कॅप्टन अमोल यादव, प्रा.बी.पी.इंगवले, प्रा.वसंतराव आर.सुुपुगडे, डॉ.टी.आर. पाटील, पोपटराव देशमुख, अँड.सुनिल पाटील, प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे आदी मान्यवरांना शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.  कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींची उज्वल, समृद्ध परंपरा लाभली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण गाडे हे होते. या समारंभासाठी प्राचार्य सुहास साळुंखे, अँड भरत पाटील (नाना), प्रा.बी.पी....

सौ.कमल दिनकर पाटील यांचे बुधवार दि.6 डिसेंबर, 2023 रोजी तृतीय पुण्यस्मरण

Image
                   शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या भगिनी तसेच शिवसमर्थ चे व्यवस्थापक श्री.नितीन दिनकर पाटील यांच्या मातोश्री सौ.कमल दिनकर पाटील यांचे मु.जितकरवाडी पलीकडील आवाड पो.जिंती, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी बुधवार दि.6 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता तृतीय पुण्यस्मरण येत आहे. त्यानिमित्त्त त्यांच्याबद्दल थोडंसं...                     काही माणसं कर्तृत्वापेक्षा आपल्या स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमची घर करुन राहतात. त्यांचे वागणे हेच त्यांचे कर्तृत्व असते. अशीच एक व्यक्ती म्हणजे माझ्या सासुबाई सौ.कमल दिनकर पाटील. दोन वर्शापूर्वी त्यांच्या आकस्मिक जाण्याची बातमी ऐकताच डोळ्याातील अश्रूंनी आपली वाट आपोआप रिकामी केली. त्यांच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. मुळात माझ्या सासुबाई मितभाषी होत्या. कुणाशी जास्त बोलत नसत. घरातल्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. घरामध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याला तांब्याभर चहा आणि एक क...

तुम्ही समाजापुढे आदर्श निर्माण करत आहात - डाॅ.सुहेल शिकलगार

Image
तळमावले/वार्ताहर ‘‘तुम्हीच आमचे आदर्श आहात, तुम्ही शरिराने दिव्यांग असाल परंतू मनाने बळकट आहात. आपण समाजापुढे एक आदर्श निर्माण करत आहात. जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रयत्न यामुळे तुम्ही आपाआपल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहात. ही बाब अभिमानाची आहे. आपल्याला मनापासून सलाम ’’ असे उद्गार प्राथमिक आरोग्य केंद्र ढेबेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुहेल शिकलगार यांनी व्यक्त केले. ते शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘दिव्यांग बांधवाच्या सन्मान सोहळयात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर शिवसमर्थ परिवाराचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे गणेश भोसले, निकम हवालदार, देवबा वायचळ सर, अमित शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. डाॅ.शिकलगार बोलताना पुढे म्हणाले की, शिवसमर्थ परिवाराने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त्त दिव्यांग बांधवांचा आयोजित केलेला सन्मान सोहळा अतिशय कौतुकास्पद असा आहे. यामुळे दिव्यांगांना जगण्याची उभारी नक्कीच मिळेल. देवबा वायचळ सर म्हणाले की, आपले शरीर कमकुवत असले तरी आपले मन मजबूत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या...

श्री वाल्मिकी विद्यामंदीरात ५१ व्या पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर             विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वाव मिळावा त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटनांमधील विज्ञान समजावे यादृष्टीने सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचेवतीने दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.            सन २०२३-२४ चे पाटण तालुक्याचे तीन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा मान श्री.वाल्मिकी विद्यामंदिर तळमावळे यांना मिळाला असून ते दि ११ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे.           या प्रदर्शनात तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी , शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांना सहभाग घेता येणार असून कृषी,पर्यावरणपूरक  जीवनशैली,संगणकीय विचार,आरोग्य या विषयावर उपकरणांचा सहभाग राहणार आहे.त्याचबरोबर लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.            सदर तीन दिवशीय प्रदर्शन हे पाहण्यास सर्वांसाठी खुले असून त्याचा लाभ सर्वांनी...