Posts

Showing posts from December, 2022

त्यांनी दिले डाॅक्टरांना कलेतून आत्मिक समाधान

तळमावले/वार्ताहर वयाच्या 18 व्या वर्षी सातारा जिल्हयातील पहिले ऑपेरेशन त्यांचे झाले आणि त्यांना खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाले. या ऑपेरेशननंतर त्यांनी कलेचे उच्च शिक्षण घेतले. कलेचे ज्ञानदान करत, अनेक मुलांना घडवत ते सेवानिवृत्त झाले. डाॅक्टर आणि दवाखान्याच्या ऋणातून ते उतराई होवूच शकत नव्हते. कारण त्यांचा जीव वाचवला होता. त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कलेतून डाॅक्टरांना आत्मिक समाधान देण्याचा विचार केला. पाटण तालुक्यातील कुठरे येथील दामोदर शामराव दिक्षीत यांचे डाॅ.एच.आर.टाटा यांनी कृष्णा हाॅस्प्टिलमध्ये 1982 साली हदयावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. मिटरल व्हाॅल्वचे होल बारीक झाल होते. त्यामुळे त्यांच्या फुप्फसावर दडपण येत होते. श्वास घेताना त्रास होत होता. धाप लागत होती. उठता बसता त्रास होता. मेजर हार्ट ऑपेरेशन करुन त्याच्या मिटरल व्हाॅल्वचे होल पाव सेंटीमिटर झाले होते. ते तीन ते सोडतीन सेंटीमिटर पुन्हा करण्यात आले. अशा तर्हेचे ऑपेरेशन त्याकाळी फक्त मिरज, पुणे, मुंबई येथेचे होत होते. कलाशिक्षक दामोदर दि...

अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा 'प्रेरणा पुरस्कार २०२२' जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे २७ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनामध्ये ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र पत्रकार मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार अक्षय म्हस्के हे गेले २४ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून सन 1998-99 पासून सुरुवात केली. प्रथम दैनिक सत्य सह्याद्री, कृष्णा एक्सप्रेस, कर्मयोगी, महासत्ता, महाराष्ट्र टाइम्स, ऐक्य प्रीतीसंगम मुक्तागिरी, लोकमंथन स्वप्नानगरी ग्रामोददार आदी. दैनिकात काम केले आहे. 2003 मध्ये सुरुवातीला दैनिक सागरमध्ये छायाचित्रकार म्हणून व 2007 पासून आजपर्यंत कराड, सातारा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. पुढे त्यांना लोकमतमध्य...

जगन्नाथ कोळेकर यांचे निधन

तळमावले/वार्ताहर तळमावले (ता.पाटण) येथील कापड दुकानाचे प्रसिध्द व्यापारी कै.जगन्नाथ कोळेकर (आण्णा) यांचे शनिवार दि. 24 डिसेंबर, 2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गणेश कोळेकर व पोलीस पाटील विशाल कोळेकर यांचे ते वडील होत. त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवार दि. 26 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता तळमावले, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भोसगांव ग्रामपंचायतीमध्ये पस्तीस वर्षानंतर सत्तांतर

तुषार देशमुख (सणबूर)-- पाटण तालुक्यात अतिशय संवेदनशील असणाऱ्या भोसगांव ग्रामपंचायतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालक मंत्री ना. शंभूराज देसाई गटाने जोरदार मुसंडी मारत सरपंच पदासह तिन जागेवर दणदणीत विजय मिळवत माजी उपसभापती प्रताप देसाई तसेच पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक प्रमोद देसाई यांना जोरदार दणका देत तब्बल पस्तीस वर्षानंतर या पंचायतीत सत्तांतर घडवण्यात देसाई गटाला यश आले आहे. गेल्या वर्ष भरापासून भ्रष्टाचाराच्या आरोपाने चर्चेत असलेली भोसगांव ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हाणामारी देखील झाली होती आणि परस्पर तक्रारी होवून प्रमोद देसाई यांच्यासह दोन्ही कडील कार्यकर्त्यांना जेलवारी सुध्दा झाली होती अशा प्रकारे गेले अनेक दिवस भोसगांव मधील ग्रामपंचायतीमध्ये धुसफूस सुरु होती. ना. शंभूराज देसाई गटातील कार्यकर्त्यानी माहिती अधिकारात वाँटर एटीएम घोटाळा बाहेर काढला तसेच ग्रामपंचायतीमधून दिल्या गेलेल्या बोगस उतार्याच्या माध्यमातून महावितरणची फसवणूक झाल्याचे समोर आले होते व महावितरणने ग्रामपंचायत मधील शिपाया विरोधात ढेबेवाडी पोलीस स्टेशनला ले...

मान्याचीवाडी मंदिरात नामजप व भंडाऱ्याचे आयोजन

तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी डोंगरावरची (गुढे) येथे श्री विठ्ठल रखुमाई भंडारा उत्सवानिमित्त नामजप यज्ञ सोहळयाचे नियोजन शुक्रवार दि.23 डिसेंबर, 2022 ते रविवार दि.25 डिसेंबर, 2022 अखेर करण्यात आले आहे. या सोहळ्याचे व्यासपीठचालक ह.भ.प. रामचंद्र महाराज शिद्रुक आहेत. शुक्रवार दि.23 डिसेंबर रोजी ह.भ.प. उदय मोरे साईकडे यांचे प्रवचन, ह.भ.प. विजय महाराज सपकाळ यांचे कीर्तन, शनिवार दि.24 डिसेंबर रोजी ह.भ.प. आराध्या अमोल कदम यांचे प्रवचन आणि ह.भ.प. निर्मला महादेव घारे यांचे कीर्तन, रविवार दि.25 डिसेंबर रोजी ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रदीप यादव साईकडे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.राजाराम महाराज माने यांचे कीर्तन यांचे कीर्तन होईल. याच दिवशी दुपारी 2 ते 5 विठ्ठल रखुमाई मंदिर ते मान्याचीवाडी मंदिर शिबेवाडी भव्य दिंडी सोहळा होणार आहे. शनिवार दि.24 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ होणार आहे. याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 वाजता विठ्ठल रखुमाई अभिषेक, सकाळी 9 ते 10 व दुपारी 3 ते 4 नामजप यज्ञ, सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व...

कृतज्ञता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

Image
 पाचवड/वार्ताहर      महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे कृतज्ञता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ दिमाखदार पणे पार पडला. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे प्रा *.झुंजार माने* हे उपस्थित होते तर  अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री लावंड टी. एस.हे होते. या सप्ताहात चित्रकला, वक्तृत्व ,निबंध व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते व विजेत्यांना आज  शालोपयोगी साहित्य देऊन गौरवण्यात आले. प्रमुख वक्ते श्री झुंजार माने यांनी मा.शरद पवार साहेब यांच्या रयत शिक्षण संस्थेतील वाटचालीचा अत्यंत मोजक्या शब्दात आढावा घेत विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कुमठेकर यांनी केले तर आभार श्री खरात एस.बी. यांनी मांनले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.मोकाशी मॅडम, श्री कचरे  बी.एस. श्री .पवार डी .आर व श्री गोसावी यांनी यांनी विशेष असे परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक ,विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

धामणी येथे 27 वर्षानंतर विध्यार्थी यांचा सस्नेह मेळावा

Image
वाझोली/विजय सुतार यांचेकडून.....                शाळेतील आठवणींना उजाळा देत धामणी ता पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. न्यू इंग्लिश स्कूल  माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९६० साली झाली. तेंव्हापासून 2022 पर्यंतच्या म्हणजेच १९९६ वर्षांतील  शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.          1996 सालच्या सर्व माजी विध्यार्थी यांनी एकत्र येत  मेळावा आयोजित करण्यात आला होता. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.      शालेय जीवना नंतर नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी एकञ यावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्ये...

विद्यार्थी सर्वगुण संपन्न असणे काळाची गरज - रविराज देसाई

Image
पाटण/वार्ताहर           मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अॅन्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी गौरवाद्गार काढले, यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार, महाविदयालयाचे  प्राचार्य श्री.ए.टी.शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.          यावेळी तालुकास्तरीय कराटे  स्पर्धेमध्ये कु.अनघा महापुरे, कु.प्राजक्ता सुतार,कु.वर्षा पाटसुते,कु.अक्षता शेजवळ,कु.सानिका तिकुडवे, कु.अश्विनी तिकुडवे तसेच कुस्ती या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला किशोर डांगे या खेळांडूचा शालेय वह्या,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.       तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ,सर...

सहकार क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती - शेखर चरेगावकर

Image
तळमावले /वार्ताहर           काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले अर्थशास्त्र विभाग व नवभारत पतसंस्था, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषद संपन्न झाली. या परिषदेत सहकार काल,आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष मा. शेखर चरेगावकर उपस्थित होते. कार्यक्रमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरूण गाडे हे होते. याप्रसंगी अमोल माने (व्यवस्थापक नवभारत पतसंस्था, तळमावले) , प्रा सुधीर सावंत, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापुजन व संस्था प्रार्थनेने झाली.           शेखर चरेगावकर म्हणाले, सहकार हे क्षेत्र पूर्वापार चालत आलेली चळवळ आहे. सहकार क्षेत्रात एकूण ५२ प्रकारच्या सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये बँक, पतसंस्था, दूध डेअरी, सोसायटी, साखर कारखाना, सहकारी सुत गिरणी, पाणीपुरवठा संस्था, इ. प्रकारच्या माध्यमातून लोकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते. लोकांनी एकत्रित येऊन लोकांच्या गरजा भाग...

स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे - सौ.सगिता येळवे

Image
तळमावले/वार्ताहर स्त्रीने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे, आपल्यामध्ये असणारे गुण ओळखून प्रगती साधली पाहिजे असे मत सुप्रसिध्द कवियित्री सौ.संगिता येळवे यांनी व्यक्त केले. त्या डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळयानिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रा.पं.सदस्या सौ.माया साळुंखे, अंगणवाडी मदतनीस मीना डाकवे, अनुसया डाकवे, ह.भ.प.नामदेव डाकवे, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल डाकवे, वसंत डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सौ.येळवे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘‘हळदी कुंकू समारंभामधून विचारांची देवाण घेवाण होते, डाकेवाडीच्या मंडळाने हा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये आपुलकी, प्रेम जिव्हाळा आहे. येणाऱ्या भावी पिढीने तो जपून ठेवायला हवा.’’ अनिल डाकवे म्हणाले, श्री दत्त मंदिर जीर्णोध्दारासाठी गावातील लोकांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे. लोकांनी मंदिरासाठी दिलेला वेळ अभिमानास्पद आहे. गावातील सामाजिक आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ...

विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दयावा- डॉ.सदीप डाकवे

Image
तळमावले/वार्ताहर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, कलेमुळे आपले जीवन समृध्द होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी काढले ते मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते यावेळी व्यासपीठावर मदने जे.एस., डोंगरे एस.एल., उदुगडे पी.एस., कुंभार एस.डी., तिकुडवे के.आर., बाजीराव पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. डाॅ.संदीप डाकवे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘लहानपणी जपलेल्या चित्रकला आणि लेखन छंदामुळे, आज माझी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शालेय वयातच आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे त्या ध्येयाच्या दृष्टीकोनातून आपण आपली वाटचाल करण्यासाठी योग्य मेहनत घेतली पाहिजे. आपण करत असलेल्या कोणत्याही कामामध्ये आपण आपले वेगळेपण जपले पाहिजे. गरजेपुरताच मोबाईलचा वापर केला पाहिजे. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. ’’ या कार्यक्रमांचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख संतोष कदम यांनी करुन दिली. यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्य...

दिनेश, लब्यू मित्रा..!

Image
दिनेश , तु एलआयसीमध्ये एमडीआरटी झाल्याचे ऐकून अंगावर काटा आला. जवळ असतास तर तुला मिठी मारुन तुझे अभिनंदन केले असते. इतका आनंद मला झाला आहे. यार....मला झर्रकन आपले शाळेचे, बालपणीचे दिवस आठवले. त्यावेळचे आपण आणि आताचे आपण किती बदल झाला आहे आपल्यामध्ये. आपण दहावीपर्यंत एकत्र होतो. त्यावेळी शाळेत नाईटला जाताना आपण किती धम्माल करायचो ते आठवून खूप हसायला येत आहे. 10 वी नंतर तू मुंबईला गेलास आणि "मुंबईवाला" झालास, आपला संपर्क या काळात थोडा कमी झाला. गावी आलास तरी तू आवर्जून भेटायचास. 10 वीच्या स्नेहमेळाव्यास कितीतरी वेळ आपण एकत्र होतो. शाळेत असताना तुझी चित्रकला सुंदर होती. तुझ्यासारखी चित्रे मला काढता यावीत असे नेहमी वाटायचे. तुझ्याकडे असलेले ग्रेड परिक्षेचे पुस्तक मी कितीदा तरी हाताळले होते. क्रिकेट, आबाधबी, लगोरी, गोटया या खेळामध्ये तू तरबेज होतास. क्रिकेटची आवड तू अजूनही जपली आहेस. मला मात्र ते शक्य झाले नाही. लहान असताना मला वाटायचे,  ‘‘काय भारी आहे याचे, शाळा झाली आणि लगेच मुंबईला’’  पण त्यावेळी तूझ्यावर असलेली कुटूंबाची जबाबदारी त्या काळात मला कळली नव्हती. तुझ्या वडिलांचे लहा...

डाकेवाडी येथे गुरुचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वै.ह.भ.प. यशवंत महाराज डाकेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नामदेव महाराज डाकेवाडीकर हे व्यासपीठचालक चालक आहेत. शनिवार दि.3 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. ज्योती लक्ष्मण डाकवे यांचे प्रवचन, ह.भ.प. सचिन महाराज डावरी यांचे कीर्तन, रविवार दि. 4 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. देवदत्त तुकाराम डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प. धोंडीराम महाराज सवादेकर यांचे कीर्तन, सोमवार दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. वैष्णवी जगन्नाथ डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.रामानंद महाराज दसूरकर यांचे कीर्तन, मंगळवार दि. 6 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. मिनाक्षी तुकाराम डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.सुमित्राताई जाधव यांचे कीर्तन, बुधवार दि. 7 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प.नाना महाराज केसरकर यांचे प्रवचन आणि ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर यांचे कीर्तन होईल. गुरुवार दि.8 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच बुधवार दि.7 डिसेंबर, 2022 रोजी ...