सतिश मित्रा, तुझा अभिमान वाटतो...!

सन 2000 ला मी 10 वी पास झालो. पुढील शिक्षणासाठी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण काॅलेजला प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून आाल्यामुळे मी तसा बावरलेल्या अवस्थेतच होतो. याचकाळात माझी कुंभारगांवाच्या सतिश शेटे या मुलाची ओळख झाली. अतिशय चुणचुणीत आणि हुशार असा हा मुलगा. त्याची अन् माझी घटट् मैत्री जमली. त्याच्या सोबतच दिनेश खटावकर, सचिन चोरेगे, अमोल मोरे, सचिन कदम इ. चांगले मित्र मिळाले. सतिशला माझी चित्रकला आवडायची. सतिशच्या घराजवळ गणेश लोकरे (सर) होते. त्यांचे ड्राॅईंग खूप छान होते. मला त्यांच्या अक्षर खूप आवडायचे. सतिशबरोबर मी नेहमी त्यांना भेटायचो. सतिश आणि माझी घरातील परिस्थिती तशी बरोबरीची असल्यामुळेच आम्ही चांगले मित्र झालो असे वाटते. 12 वी नंतर मी एटीडी ला सातारा येथे प्रवेश घेतला. तर सतिशने कुठे अॅडमिशन घेतले हे कळलेच नाही. एक दिवस तो मिलीटरीत भरती झाल्याचे कळाले खूप अभिमान वाटला. कुणाकडून तरी त्याचा पत्ता घेवून मी त्याला 1 ते 2 पत्रे लिहल्याचे आठवत आहे. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क झाला नाही.

मंगळवार दि 01 जून, 2021 रोजी तब्ब्ल 20 वर्षांनी सतिश भेटला. तो भेटल्यानंतर खूप आनंद वाटला. मी त्याच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. काॅलेजचे दिवस आठवले. दरम्यान, सतिशने आपल्या जीवनाला कलाटणी कशी मिळाली याचा पटच माझ्यापुढे उलघडला. प्राथमिक शाळेतील कीर्तने मॅडम, करपे मॅडम, माध्यमिक शाळेतील चैगुले सर कितीतरी जणांच्या आठवणी आणि प्रसंग त्यांने सांगितले. 12 वी नंतर आयटीआयला गेल्यानंतर पाचवड येथील खराडे मामांनी केलेले सहकार्याबद्दल त्याच्या बोलण्यातून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. भरतीसाठी त्यांच्याकडून घेतलेले पैसे व इतर मदत. आयुष्यातील प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून कसे पाहावे हे सतिशच्या वाटचालीतून दिसून आले. आज सतिश श्रीनगर येथे मिलीटरी मध्ये नाईक या पदावर काम करत आहे. संघर्ष काय असतो?, स्पिरीट म्हणजे काय?, डिसिप्लिन कशाला म्हणतात? हे सतिशकडून ऐकायला मिळाले. किती बिकट परिस्थितीतून सतिशने यश मिळवले आहे. त्याचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर आपण आयुष्यात कष्ट करायला खूप कमी पडलो याची खंत वाटते. सन 2001 ला मला भेटलेला सतिश आणि तब्बल 20 वर्षांनी सन 2021 मध्ये भेटलेला सतिश याच्या स्वभावात काहीच फरक जाणवला नाही. कौटुंबिक परिस्थती त्याने स्वतःच्या परिश्रमाने, कर्तबगारीने स्वतःहून बदलली आहे. इतक्या वर्षानंतरही तो माझी सारखी आठवण काढतो यात मला समाधान वाटते. त्याचा आणि माझा मित्र प्रशांत चाळके यांच्याशी बोलताना सतिश माझा नेहमी उल्लेख करतो. एक मित्र म्हणून मला सतिश याचा अभिमान वाटतो.

        सतिशने सांगितलेला प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. सतिशने शाळेत असल्यापासून आपले ध्येय डोळयासमोर ठेवले होते. व त्यादृष्टीने तो नेहमी वाटचाल करत होता. तो भरती झाल्यावर ट्रेनिंग करुन आला आणि गावात पेढे वाटले. परंतू अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून तो नंतर आला तो मिलीटरीची वर्दी घालूनच. त्यावेळी मात्र लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला.

अनेकांना कित्येक प्रयत्न करुनही भरती होता येत नाही. परंतू काही दिवसाच्या अंतरावर सतिशला सरकारी नोकरीची 2-2 अर्पाॅइंमेट लेटर आली. अशा सतिशच्या जिद्दीचे कौतुक करावे लागेल.

            स्ट्रगल, कडी मेहनत, भरपूर अभ्यास या गोष्टी वाचताना सोप्या वाटतात. सतिशच्या तोंडूून ऐकताना नकळत माझ्या डोळयाच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. सन 2019 ला त्याच्या मुलीचा, सासू-सासरे यांचा झालेल्या अपघाताचा प्रसंग त्याने सांगितला. त्यावेळी माझ्या काळजावर कोणीतरी घाव घातल्याचा भास झाला. इतकच्या बिकट प्रसंगातून देखील सतिश सावरला आहे. एक नम्र, हुशार, निगर्वी, साधा असलेला सतिश वर्दीची कपडे घालून आज देशाच्या सीमेवर उभा आहे. या बद्दल खूप समाधान वाटले. 

        आमच्या गप्पा संपल्यानंतर मी त्याला त्याच्या नावातील अक्षरगणेशा चित्र भेट दिले. त्याला स्पंदन दिनदर्शिका घेवून फोटो काढला.  त्यामुळे 1 जून हा दिवस सतिश च्या आठवणीची ‘धून’ मनात ठेवून गेला. 

सतिश तुला सलाम..!

- तुझा मित्र डाॅ.संदीप डाकवे





Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग