सेल्फी विथ गुढी' स्पर्धेत सहभागी होण्याचे 'स्पंदन' चे आवाहन
तळमावले/वार्ताहर : गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुध्दप्र तिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्याप हिल्या दिवशी महाराष्ट्रात साजराके ला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. दारीउ भारलेली गुढी हे विजय आणि समृध्दीचे प्रतिक आहे असे मानले जाते. त्याचे औचित्य साधत' चला संस्कृती जपूया' ही टॅगलाईन घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने 'सेल्फी विथ गुढी' हीअ नोखी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. सध्या अनेकजण सेल्फी काढून फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करीत असतात. सेल्फी काढण्याचा मोह तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याचा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ. संदीप डाकवे यांनी केला. आजही आपण आपली संस्कृती तितक्याच उत्साहाने जपत आहोत हे दर्शवण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्...