Posts

Showing posts from January, 2026

न्यू इंग्लिश स्कूल खळे येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

Image
  तळमावले :-            खळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  या विद्यालयात नुकतेच  कराड को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक माननीय श्री. आनंदराव कचरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ही मदत केली.  या प्रसंगी  त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू  सूर्यकांत कचरे तसेच नवी मुंबई येथील नवनिर्वाचित नगरसेविका  दिक्षा  कचरे उपस्थित होत्या.      या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल खळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील कांबळे , पल्लवी निकम  प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख रमेश  पवार विकास चव्हाण विद्या यादव उपस्थित होते. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना पुढील शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी  पल्लवी निकम यांनी आभार मानले.

सैदापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
कराड/वार्ताहर जाधव परिवार आणि शिवम् असोसिएटस कराड टीम यांच्या वतीने शिवम हाऊस येथे मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेला हळदीकुंकू कार्यक्रम अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिवम असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), पीएसएल लीडर पुनम जाधव, अश्विनी पवार, रेश्मा डाकवे, अश्विनी पवार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत पुनम जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले. प्रास्ताविक रेश्मा डाकवे यांनी केले. सर्व मान्यवर व महिला वर्गाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षितीज जाधव, राज जाधव, गणेश जाधव, स्पंदन डाकवे, सांची डाकवे व अन्य मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना शिवसमर्थच्यावतीने अभिवादन

Image
तळमावले/वार्ताहर             नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटी लि. व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने तळमावले येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे, व्यवस्थापक नितीन पाटील, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संदीप डाकवे व संस्थेचे अन्य अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.                कार्यक्रमाची सुरुवात करताना नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून तसेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर संस्थेच्या प्रशासन विभागाचे व्यवस्थापक श्री. संदीप डाकवे यांनी सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि प्रास्ताविक मांडले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा संक्षिप्तपणे आढावा सांगितला. अनिता मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तद...

मुंबई महानगरपालिकांमध्ये ढेबेवाडी विभागातील शिलेदारांना 'सिक्सर'

Image
  तळमावले/संदीप डाकवे  राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्वाच्या 5 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरामध्ये ढेबेवाडी विभागातील गावाकडच्या शिलेदारांनी 'नगरसेवक' पदाचा 'सिक्सर' मारला आहे, त्यामुळे विभागात आनंदाची लहर पसरली आहे.  ॲड.भारतीताई पाटील (मंद्रुळकोळे), विठ्ठल लोकरे (मानेगाव), डी.आर.पाटिल (महिंद), सौ.अश्विनी माटेकर (माटेकरवाडी), विक्रांत वायचळ (वायचळवाडी-कुंभारगाव), वैशाली मस्कर (येळेवाडी), दीक्षा कचरे (खळे) ही या शिलेदारांची नावे आहेत. यांची जन्मभूमी वांगव्हॅली असली नरी सध्या कर्मभूमी मुंबई आहे. या कर्मभूमीत प्रत्येकांनी आपापल्या कर्तृत्वाचा झेंडा रावला आहे. माथाडी नेते स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या कन्या ॲड. सौ. भारती पाटील या कोपरखैराणे विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेत विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पतीही निवडणुकीत विजयी झाले आहेत. मानेगाव येथील असलेले विठ्ठल गोविंद लोकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 141 (मानखुर्द) एम वॉर्ड चेंबूर ...