" कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती i जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी "
डॉ.नितीन बेलागडे /ढेबेवाडी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतात अडचणीही येतात त्यावेळी त्याला गरज असते ती आधाराची आणि तो आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने मित्र करत असतो. "कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती" आणि म्हणून मित्रांचे स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असते. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व शाळेतील मित्र एकत्र आलो आहोत संकटाच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. कुठलाही भेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखांनी जपली पाहिजे. अशी भूमिका प्रसाद जानुगडे यांनी स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडली. 30 वर्षांपूर्वी १९९६ इयत्ता दहावी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ढेबेवाडी येथील कर...