Posts

Showing posts from April, 2025

रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष हे ॲक्शन मोडवर

Image
कराड/वार्ताहर                     बोगस व टाळा करणाऱ्या वाहन विमा कंपन्यांवर ती कारवाई करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी केलेली आहे. त्याचबरोबर कराड उत्तरेस असलेलं बांधकाम कामगार ऑफिस मध्ये लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होताना पाहायला मिळालेली छोटसं ऑफिस असल्यामुळे ऑफिसमध्ये तुंबळ गर्दी होत आहे. पिण्याचे पाणी नाही, शौचालय नाही, लोकांना बसण्याची व्यवस्था नाही,  सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑफिस शिफ्टिंग करण्यात यावा अशी मागणी अक्षय चव्हाण यांनी केली आहे. जनता मालक आहे आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेची सेवा करण्याची तुमचे कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये संबंधित स्टाफ लोकांशी गैरवर्तवणूक करताना पाहायला मिळालेला आहे. याचा जाब विचारता अक्षय चव्हाण यांनी तहसीलदार सो कराड कल्पना ढवळे व उप पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सिद्धेश पाटील, महेश जिरंगे, अनिल कदम, चंद्रकांत कदम सर्व पदाधिकारी उपस्थित होते

शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे एन.एम.एम.एस.परीक्षेत सुयश

Image
 पाटण -                  राष्ट्रीय आर्थिकदृष्टया मागास शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच अंतरिम निकाल लागला असून मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयातील एन.एम.एम.एस.राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी कु.तिकुडवे सान्वी दिनकर ही विद्यार्थीनी  सातारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत १७वी आली आहे. तसेच  विद्यालयातील  सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कु.चव्हाण वैष्णवी काशिनाथ, पाटील राजवर्धन सूर्यकांत, शेजवळ ललित आनंदा, शेजवळ गणेश अरुण, कु.शेजवळ संस्कृती हणमंत, देसाई हर्षवर्धन कैलास, कुंभार हर्षवर्धन सर्जेराव, पानस्कर सार्थक निवास, माने अभय संदीप, पवार वेदांत शिवाजी, कु.शेजवळ श्रावणी सुहास, कु.शेजवळ रिया नितीन, कु.शेजवळ अनुष्का विजय, पाटील आर्यन बाबुराव, शेजवळ अर्थव प्रकाश, खांडेकर सुषमा संतोष या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे,                     या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...

चाफळ विभागात अवैध वृक्षतोड

Image
चाफळ/सुनील पवार यांचेकडून                समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चाफळ विभागात अगदी निर्धोकपणे सागाची वृक्षतोड सुरू आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चाफळ परिसरातील वनसंपदा गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी होत असताना अशाप्रकारे होणारी वृक्षतोड ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे.                 उन्हाळा सुरू झाल्यामुळे पानगळ सुरू आहे. जंगलातील गवत सुकले आहे. याच कालावधीत दरवर्षी जंगलात मोठ्या प्रमाणावर वणवे लागून अनेक वनस्पती, प्राणी आणि पक्षी प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशातच यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे चाफळ विभाग, पाटण तालुका, सातारा जिल्हा पर्यटन भरारी घेण्याच्या तयारीत असताना अशाप्रकारे होणारी वृक्षतोड हा पर्यटन, पर्यावरण आणि एकूणच निसर्गाची हानी करणारी आहे. वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरीकांमध्ये या बाबीचा असंतोष खदखदत आहे  ...