Posts

Showing posts from February, 2025

विश्वास दाजी मोहिते यांचे निधन

Image
कराड/वार्ताहर कोळेवाडी (ता.कराड) येथील विश्र्वास दाजी मोहिते यांचे शनिवार दि. 22 फेब्रुवारी, 2025 रोजी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. कोळेवाडी येथील श्री गणेश मंदिराचे ते पुजारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवार दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता गणपती मंदिराच्या बाजुला मु.पो.कोळेवाडी, ता.कराड, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मानवी मुल्यांसाठी कलासक्त असणे आवश्यक - वैशाली राजमाने

Image
  सातारा /वार्ताहर      गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा ( पाटखळ माथा ) सातारा व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था म. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ,18, 19 फेब्रुवारी 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 28 वे वार्षिक कला प्रदर्शन दिनांक 19 फेब्रुवारी अखेर दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह कन्या शाळे पाठीमागे शनिवार पेठ सातारा येथे सुरू होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्रीमती वैशाली राजमाने (उप- जिल्हाधिकारी ) सातारा यांच्या हस्ते दिनांक 17 रोजी पार पडले, यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री शिरीष चिटणीस (संस्थापक चेअरमन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ) प्रा. मा.श्री रमेश ओहोळ (सेवानिवृत्त प्राध्यापक ) तसेच पुणे येथील व्यावसायिक चित्रकार विवेक दहिवले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री डॉ.अनिरुद्ध जगताप (संचालक, सदस्य गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी सातारा ) यांनी भूषवले याच दिवशी विवेक दहिवले या चित्रकारांनी व्यक्तिचित्रण...

शर्विल गावडे ने भरवला बालकांना सुखाचा घास देऊन साजरा

Image
नवी मुंबई/ वार्ताहर  रामभाऊ महादेव कोळेकर संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी भाचा शर्वील संगम गावडे याचा वाढदिवस दिघा नवी मुंबई येथील प्रिसकिल्ला चिल्ड्रन्स होम ( फ्रेण्डशिप सेंटर)  या अनाथ आश्रम मधील मुलांना जिवनावश्यक वस्तु देत वाढदिवस साजरा केला.  मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे  आशिर्वाद मिळतील. आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदत रुपी सेवा करुन  त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहोत. आजपर्यंत आधार फाऊंडेशन घ्या माध्यमातून अनाथ आश्रम, वृध्द आश्रम खेडेगावातील शाळा व विधवा आधार नसलेल्या महिलांन साठी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत, ईथुन पुढेही अशीच चांगली सेवा हातुन घडावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

सचिन च्या चहाची चवच न्यारी.....पण भागवेना कोणी उधारी

Image
नितिन बेलागडे/ढेबेवाडी  घरात वृध्द आई बायको आणि चार मुलं त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो चहा विकतोय त्यांच्या चहाची चवच लय न्यारी आहे पण सध्या त्याची कोणी भागवेना उधारी त्या मुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. ढेबेवाडी येथील सचिन बेडखळे यांच्या वडिलांच्या पासून चहा चा व्यवसाय आहे. निस्वार्थ भावनेने गेली चाळीस वर्षे पन्नास वर्षे हा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला आहे. सचिन बेडखळे यांचे वडील ढेबेवाडी येथील डॉ राव यांच्या दवाखान्यात जवळ छोट्या टपरीवर हा व्यवसाय करीत होते. दवाखान्यातील रुग्णांना व य भेटायला येणार्या नातेवाईकांना त्या मुळे चहा उपलब्ध होत होता. डॉ राव दवाखाना बंद झाल्या नंतर  आता सचिन बेडखळे यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुन्हा घरी चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. ढेबेवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोर त्याच घर आहे त्या घरातच तो चहा बिस्किटे विकतो. किंबहुना भोसगाव, आवाड, आण्णासाहेब पाटील नगर,आय टी आय काॅलेज, पोलिस स्टेशन,  ग्रामीण रुग्णालय,  कभापा विद्यालय, प्राथमिक शाळा ढेबेवाडी, वनविभागाच्या कार्यालय, दुकानदार व्यापारी यांना मोबाईल काॅल...