Posts

Showing posts from November, 2024

सत्यवान मंडलिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

Image
कराड/वार्ताहर                जग बदल घालूनी घाव| सांगून गेले मला भीमराव||' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कर्जत तालुका साहित्य प्रेमी मंडळ अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव तालुका कर्जत येथे आयोजित समितीचे अध्यक्ष अभ्यासू, विचार व साहित्याची जाण असणारे तरुण मा श्री तानाजी डाडर, मार्गदर्शक असणारे उपाध्यक्ष मा प्रा श्री देवीदास राऊत आणि त्यांच्या विचारांना साथ करीत नेहमीच सक्रिय असणारे कार्याध्यक्ष मा श्री सुनील गाडे यांनी अपार कष्ट घेऊन आयोजित केलेले थोर साहित्यिक शंकर भाऊ साठे यांच्या स्मृतींना समर्पित करणारे सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ साठे पहिले  ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले.             संमेलन सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ढोल ताशा आणि लेझमाच्या तालात परिसर दणाणून सोडला. या भव्यदिव्य सोहळ्यातील उपस्थितांच्या उत्साहाने अण्णाभाऊंनी सांगितलेल्या विचारांची प्रेरणा य...

वरळी सानेगुरुजी कथामालेच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

Image
मुंबई/प्रतिनिधी      वरळी सानेगुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष श्री रमेश तांबे यांच्या १) स्वराची ४२ पत्रे, २) शिक्षा आणि ३) गोष्ट सांगा गोष्ट या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री हनुमान मंदिर येथे मोठ्या थाटामाटात आणि प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी, लेखक आणि समीक्षक श्री रमेश सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सांनेगुरुजींच्या 'खरा तो एकचि धर्म' या प्रार्थनेने झाल्यानंतर वरळी कथामालेचे अध्यक्ष श्री देवकीनंदन मुकादम यांनी प्रास्ताविकामध्ये कथामालेच्या कार्याचा आढावा घेऊन सानेगुरुजी १२५ अभियानाचे महत्व विशद केले. सदर तीन पुस्तकांचे परीक्षण सौ प्रज्ञा वनारसे, श्री सुकुमार नितोरे आणि श्री देवकीनंदन मुकादम यांनी केले व सदर पुस्तकातील गमती जमती सांगून पुस्तके विध्यार्थ्याना नक्कीच आवडतील असे आवर्जून सांगितले.

बोटावरील मतदानाची शाई दाखवा अन् अक्षरगणेशा मिळवा, मतदान टक्का वाढवण्यासाठी डॉ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

Image
तळमावले/वार्ताहर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम व जनजागृतीचे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. ‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान यंदा राबवण्यात आले आहे. येत्या बुधवार दि.20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरता पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी स्वतःहून पुढाकार घेण्यात आला आहे. मतदान केल्यानंतर ‘बोटावरील मतदानाची शाई दाखवा आणि अक्षरगणेशा मिळवा’ असा अनोखा उपक्रम डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवला आहे. डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा, फर्मचा अक्षरगणेशा रेखाटून त्या बदल्यात त्यांना रुपये दोनशे पन्नास मूल्य द्यायचे आहे. एरवी याच अक्षरगणेशाचे मुल्य रु.पाचशे किंवा त्याहून जास्त असते. या उपक्रमातील सहभागामुळे आपणास अक्षर...

बादेवाडी येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार

Image
 तळमावले/संदीप डाकवे पाटण तालुक्यातील बादेवाडी येथील आनंदा म्होप्रेकर यांच्या शेळीवर रात्री बिबटयाने हल्ला करुन तिला ठार केले आहे. काल (रविवार दि.10 मार्च रोजी) पहाटे 1.30 च्या दरम्यान ही घटना घडली. आनंदा म्होप्रेकर हे अपंग आहेत. या आठवडयातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी सुनील आत्माराम पवार यांच्या घराच्या गच्चीवर बिबटयाने पाळीव कुत्र्याला हल्ला करुन ठार केले आहे. भर वस्तीत अशा घटना घडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आज येथे तर उद्या दुसरीकडे बिबटया दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः  हैराण झाले आहेत.  सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे शेतातील पीके काढणीच्या अंतीम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग डोळयात तेल घालून रात्रंदिवस पिकाची राखण करत आहे. मात्र बिबटयाच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग पुरता घाबरुन गेला आहे. एरवी रानामध्ये चरावयास सोेडलेल्या जनावरांवरती बिबटयाने हल्ला केल्याच्या घटना कळत होत्या. परंतू गावामध्ये येवून घरातून, गोठयात बिबटयाचा वावर वाढला असल्याने वनविभागाने अशा घटनांकडे गांभीर्याने पहावयास हवे आहे. अन्यथा मोठा अनर्थ ...

माथाडी दवाखान्यातुन सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न- गुलाबराव जगताप

Image
नवी मुंबई (संजय सावंत) नवी मुंबईतील माथाडी कामगारांसाठी असलेल्या माथाडी दवाखान्यातुन चांगली आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन माथाडी दवाखाना चे विश्वस्त व हिंदूस्थान सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले. रोटरी क्लब नवी मुंबई सी विभाग क्रास टिंबर्स रोटरी टेक्सास, युएस यांचे मार्फत सोनोग्राफी उपकरण व डेंटल इक्विपमेंट अरुण मुर्ती यांच्या मातोश्री डॉ लीला मूर्ती स्मरणार्थ भेट वाटप कार्यक्रम माथाडी दवाखाना कोपरखैरणे नवी मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्य अतिथी रोटरीयन दिनेश मेहता-(डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), रोटरीयन सुनील शाह- अध्यक्ष, रोटरीयन बी. व्ही.रविप्रकाश-प्रोजेक्ट चेअरमन, माथाडी हॉस्पिटलचे ट्रस्टी गुलाबराव जगताप, माथाडी दवाखाना वैद्यकीय अधिकारी हनुमंतराव पाटील, डॉ.सौ.राजश्री पाटील, डॉ.अशोक पाटील, रोटरी क्लबचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव जगताप म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या दूरदृष्टीतून माथाडी दवाखान्याची स्थापना करण्यात आली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून कष्टकरी माथाडी कामगारांना अत्यल्प सवलतीच्या दरामध्ये ...

व्हाटसअपच्या माध्यमातून एकत्र येत शाळेला दिला लॅपटाॅप

Image
तळमावले/वार्ताहर सध्या मोबाईल वापरणारे व्हाटसअप वापरत नाही असे लोक अपवादात्मक आढळतील. या व्हाटसअप मधून अनेक चांगली कामे होत असतात. अशाच एका ग्रुपच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कुल कुठरे च्या 1989 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 35 वर्षानी एकत्र येवून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच केवळ एकत्र न येता शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून लॅपटाॅप देवून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. बॅचचे माजी विद्यार्थी आणि सध्या ठाणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले विकास पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मोरे सर, ढेरे सर, देवकर सर, चव्हाण सर, बुधे सर, लोहार सर, दिक्षीत सर, शिंदे सर, भोई सर, भोई मॅडम, गुरव सर, पाटील मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास राजाराम सागावकर, अरुण कदम, विलास पवार, महादेव पवार, आनंदा भिंगारदेवे, विजय नलवडे, आण्णा पाटील आणि सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनीना सन्मानचिन्ह आणि साडी तर माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच या बॅच मधील जे विद्यार्थी ...