वांगव्हॅली पत्रकार संघाच्या शिव संस्कार महोत्सव स्पर्धेचे निकाल जाहीर
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील वांगव्हॅली पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा-गीतगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष नितीन बेलागडे, सचिव विजय सुतार, चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, तुषार देशमुख, पोपटराव झेंडे, हरीष पेंढारकर, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, पोपटराव माने, प्रदिप माने व अन्य उपस्थित होते. स्पर्धेचे नांव आणि अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे : वेशभूषा स्पर्धा (लहान गट): हर्षवर्धन हिंमत जानुगडे, आयेशा नागेश मोरे, अथर्व कैलास मत्रे, वेशभू...