Posts

Showing posts from June, 2023

शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज -के.जे.चव्हाण

Image
पाटण           मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये 21 जून आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण हे या योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की, योगाचे महत्व तसेच व्यायाम करणे आजच्या काळात गरजेचे आहे,याला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे,बदलत्या जीवनशैलीमध्ये आपले शरीर तंदुरस्त असावे असे वाटत असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे,असे यावेळी आपले मत व्यक्त  केले,तसेच 21 जून योगदिनाचे  महत्व आपल्या प्रास्ताविकेतून उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले तसेच  योगाचे प्रात्यक्षिकही  केले ,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विदयार्थ्यांचा उस्फूर्तपणे सहभाग होता.

कुठरेचे दीक्षित डी.एस.राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

Image
तळमावले/वार्ताहर      राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना साहित्यिक व विचारवंत डाॅ.बाबुराव गुरव यांच्या हस्ते देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड.करुणा विमल, प्रमुख पाहुणे आ.ऋतुराज पाटील, प्रा.आ.जयंत आसगांवकर, माजी आमदार राजीव आवळ व अन्य मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला.           यावेळी डी.एस.दीक्षित यांच्यासमवेत सौ.रुक्मिणी दीक्षित, चेतन दीक्षित, ज्योती दीक्षित, वैशाली सुतार, रविराज सुतार, गणेश वाईकर, सुनिल आसवले, भोई बी.बी. हे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल डी.एस.दिक्षीत यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिन आणि आपण

Image
                  हिंदुस्थानचा इतिहास पाहता वेद उपनिषदांच्या काळापासू न म्हणजेच सुमारे ५००० वर्षांपासून हिंदुस्थानास ऋषीमुनींची परंपरा लाभलेली आहे आणि त्या काळातील अनेक ऋषीमुनींनी योगाभ्यास व योग साधनेद्वारे कठोर तपश्चर्या करून बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती करून या साधनेतून मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो आणि मनाची एकाग्रता व आत्मविश्वास प्राप्त करता येऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे आणि इतिहास त्याचा साक्षी आहे.          पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वतः योगविद्येचे उपासक आणि प्रसारक असल्याने आणि योगसाधनेद्वारे मन,मेंदू आणि मनगट यांचा विकास होऊन प्रवृत्ती व प्रकृती यांत सकारात्मक बदल होऊन मानसिक स्वास्थ्य लाभून विश्व आरोग्यसंपन्न, सकारात्मक, आशावादी व शांतताप्रिय व्हावे या उदात्त हेतूने सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात २१ जून हा *जागतिक योगदिन* म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला आणि तो १७७ राष्ट्रांच्या पाठिंब्याने संमत झाला.आश्चर्य म्हणजे या आठ नऊ वर्षाच्या कालखंडात १९३ देशात हा दिवस साजरा होऊ ...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवा! - राज्यपाल मा. रमेशजी बैस

Image
मुंबई (8 जून २०२३) :                 महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात संसदीय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण केली. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत विकास आदी क्षेत्रांत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेशजी बैस यांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बुधवारी, ७ जून रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.             लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा धांडोळा घेणाऱ्या 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन-संपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले असून बुधवारी मुंबईतील राजभवन येथे या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेशजी बैस यांनी लोकनेते ...

लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न

Image
मुंबई/वार्ताहर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्स च्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार डी.एस.दीक्षित यांना जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर                     धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा कोल्हापूरातील राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार कुठरे येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक दामोदर शामराव दिक्षीत यांना जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळात दिक्षीत सरांनी पिंपळपानावर चित्रे रेखाटण्याचा छंद जपला त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये झाली होती. याशिवाय शैक्षणिक काम करताना अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले होते. बोलक्या भिंती, टाचण वही हे उपक्रम त्यांचे विशेष गाजले.                     चित्रकला क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केल्याचे अॅड.करुणा विमल यांनी सांगितले. राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार-2023 या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांची पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वा. राजर्षी शाह...

मोरणा शिक्षण संस्थेची निकालाची परंपरा कायम

 पाटण -माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोरणा शिक्षण संस्थेने निकालाची परंपरा कायम राखली आहे,यामध्ये शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा निकाल 95.16 टक्के लागला असून कु. आदिती निवास पानस्कर-  88.80%(प्रथम),कु. प्रतिक्षा लक्ष्मण मळेकर - 88.40%(द्वितीय),कु. साक्षी संतोष शेजवळ - 86.40%(तृतीय),तसेच न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा निकाल 100टक्के लागला असून कु. पवार रूपाली संजय 86.00% (प्रथम),कु. यादव रसिका सुरेश - 84.60%(द्वितीय),गालवे रोहित सुनील  - 82.60%(तॄतीय),त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या विदयालयाचा निकाल 100टक्के लागला असून रसिका उत्तम भिसे 81.56%(प्रथम),नम्रता पांडुरंग भिसे 79.34% (द्वितीय),विदीपा बापुराव भिसे 78.63%(तृतीय),तसेच वत्सलादेवी इंग्लिश मिडिअम स्कूल दौलतनगर या इंग्रजी माध्यमाच्या विदयालयाचा सलग तीन वर्षे 100टक्के निकाल लागला असून सांळुखे श्रृती दिपक  87.60%(प्रथम),भिसे शुभम धनाजी 86.40%(द्वितीय), जाधव अमृता श्रीमंत 84.00%(तृत्तीय)असे विविध शाखेतील विदयार्थ्यांनी सुशय संपादन केलेले आहे...