Posts

Showing posts from November, 2022

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- नामदार शंभूराज देसाई

Image
दौलतनगर दि .20:-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व .  शिवाजीराव देसाई  ( आबासाहेब )  यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व . शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत :  सहकाराची दिशा मिळवून दिली . सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली . शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे . त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही लिलया पेलत आहोत .  स्व . आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले . लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व . आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा...

हरित विद्यालय संकल्पनेवर निशंक चा राष्ट्रीय महोत्सव

Image
सातारा/प्रतिनिधी निशंक सोसायटी फॉर एज्युकेशन,आर्ट अँड कल्चर ही भारत देश आणि समाजासाठी समर्पित, संवेदनशील, प्रेरणादायी शिक्षक, प्रशिक्षक व शिक्षणतज्ञांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली निशंक ही एक राष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. या सोसायटी मार्फत राष्ट्रीय महोत्सव सातारा येथील यशोदा टेक्नीकल कँम्पसमध्ये दिमाखदारपणे संपन्न झाला.हरित विद्यालय (ग्रीन स्कूल)या नव शैक्षणिक संकल्पनेच्या अनुषंगाने प्लॅस्टीक मुक्त शाळा करण्याची सुरुवात झाली, शिक्षण विभागाच्या सहकार्याने  शहरातील विविध शाळां चित्ररथ व विविध वेशभूषेसह जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. या मध्ये सातारातील विविध शाळांनी चित्ररथ तयार केले होते, तसेच चौकाचौकात लेझीम,झांजपथके, प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारी पथनाट्ये व गीतांचा या जनजागृती रॅलीत सहभाग होता, ही संदेशपूर्ण रॅली महाराजा सयाजीराव विद्यालयापासून सुरुवात होऊन राजपथावरून कन्याशाळा  व प्रतापसिंह हायस्कूल येथून खालच्या रस्त्याने पोवई नाका येथील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देत कर्मवीर समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून रॅली संपन्न झाली.  या जनजागृती...
Image
  शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या भगिनी तसेच शिवसमर्थ चे व्यवस्थापक श्री.नितीन दिनकर पाटील यांच्या मातोश्री सौ.कमल दिनकर पाटील यांचे शुक्रवार दि.18 नोव्हेंबर, 2022 रोजी व्दितीय पुण्यस्मरण येत आहे.  त्यानिमित्त्त त्यांच्याबद्दल थोडंसं... प्रेमाची सावली - सौ.कमल दिनकर पाटील काही माणसं कर्तृत्वापेक्षा आपल्या स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमची घर करुन राहतात. त्यांचे वागणे हेच त्यांचे कर्तृत्व असते. अशीच एक व्यक्ती म्हणजे माझ्या सासुबाई सौ.कमल दिनकर पाटील. दोन वर्शापूर्वी त्यांच्या आकस्मिक जाण्याची बातमी ऐकताच डोळ्याातील अश्रूंनी आपली वाट आपोआप रिकामी केली. त्यांच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. मुळात माझ्या सासुबाई मितभाषी होत्या. कुणाशी जास्त बोलत नसत. घरातल्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. घरामध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याला तांब्याभर चहा आणि एक कप चहा दिल्याशिवाय गेलेली व्यक्ती मला तर आठवत नाही. स्वतः आजारी नसलेली व्यक्ती दुसऱ्याबरोबर व्यवस्थित बोलेल, गप्पा मारील, त्याचा पाहुणचार व्यवस्थित करेल पण ज्यांच्या जगण्याला औषधाचीच काय...

यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे वितरण

Image
  मुंबई/प्रतिनिधी  यशवंतराव चव्हाण फाउंडेशन  व जया अलीमचंदानी फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2022 ॲड माजी आमदार माधवी नाईक यांच्या हस्ते विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक  होते. या कार्यक्रमास भरत पाटील, चंद्रकांत चाळके, सुनील मस्कर, प्रकाश बोत्रे, अंकुश सावंत, हेमंत ताईगडे , सचिन पवार ,सुवर्णा पाटील, विद्या मोरे, विदयाराणी सकटे उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत म्हणाले की, सहकार, शिक्षण,  सांस्कृतिक, पत्रकार, शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, समाजसेवा या विभागातून विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रतिवर्षी 2018 पासून देण्यात येत आहे, या याआधी गणेश नाईक, प्रवीण दरेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. पुरस्काराच्या माध्यमातून लोकांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणे या हेतूने या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ॲड. माधवी नाईक म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात तसेच राजकारण...

श्री. विक्रमसिंह देसाई यांची रयत बँकेवर संचालक म्हणून निवड

काळगाव /महादेव थोरात यांचेकडून राज्यातील 16 जिल्ह्यात श्री. विक्रमसिंह देसाई यांची रयत बँकेवर संचालक म्हणून निवड असणारी पगारदार सेवकांची राज्यातील दोन नंबरची बँक दि. रयत सेवक को. ऑफ. बँक लि, सातारा या बँकेची सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधी करिता निवडणूक पार पडली या मध्ये बँकेवरती रयत सेवक मित्र मंडळ पॅनलची सत्ता आली असून सर्वसाधारण गटातून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, काळगाव ता. पाटण या शाखेचे कर्मचारी श्री. विक्रमसिंह तानाजीराव देसाई हे प्रचंड मतांनी संचालक म्हणून निवडून आलेले आहेत.          बँकेची सभासद संख्या 10500 च्या वरती असून बँकेच्या 21 शाखामधून सुमारे 2200 कोटींचा व्यवसाय आहे.  रयत बँक ही महाराष्ट्रातील एक नामांकित बँक म्हणून ओळखली जाते. बँकेच्या निवडणुकीमध्ये कराड कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रावरती रयत सेवक मित्र मंडळ पॅनलच्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी सुमारे 50 मतांची आघाडी घेतलेली होती.       श्री. विक्रमसिंह देसाई यांच्या विजयानंतर अनेक मान्यवरांनी, आजी-माझी रयत सेवकांनी, पापर्डे गावातील...
Image
  पाटण तालुक्यात सिने कलाकारांची  मांदियाळी..!* तब्बल ११० मराठी कलाकारांची उपस्थित राहणार...! मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी जोरदार 'शंभुदौलत जल्लोष' तयारी संभाजी भिसे/नवारस्ता महाराष्ट्राचे उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १७ रोजी सिने क्षेत्रातील तसेच विविध टीव्ही मालिकेतील तब्बल ११० सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे 'शंभुदौलत जल्लोष' हा भव्य संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे आजपर्यंत सिनेमाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या  कलाकारांची मांदियाळी पाटण तालुक्यात पहावयास मिळणार आहे.  शंभूराज देसाई यांचा वाढदिवस म्हटले की तमाम जनतेच्या आणि मतदारांच्या मनोरंजनासाठी देसाई नेहमीच आपल्या मतदारसंघात मतदार आणि जनता यांच्यात आनंदाचा जल्लोष निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.मग सत्ता असो अथवा नसो किंवा विरोधकांनी कितीही टीका टिपण्या केल्या तरी शंभूराज देसाई यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यासाठी आपल्या नेत्याचे  मन तृप्त करणारे भाषण  ऐकू...