कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन. दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६२ वी पुण्यतिथी अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.कै.ताईसाहेब यांचे ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या पध्दतीने केवळ पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६२ वी पुण्यतिथी करण्याचा निर्णय ना.देसाईंनी घेतला व पुण्यतिथीनिमित्त त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती...