डाकेवाडी येथे गुरुचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पारायणाचे यंदा 33 वे वर्ष आहे. वै.ह.भ.प.यशवंत महाराज डाकेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नामदेव महाराज डाकेवाडीकर हे व्यासपीठचालक चालक आहेत. विनापूजन यशवंत मारुती डाकवे, उद्घाटन हरी बळी डाकवे, तुकाराम गोविंद डाकवे, मुर्तीप्रतिष्ठापना अशोक रामचंद्र डाकवे, ग्रंथपूजन बाळू बाबू डाकवे यांच्या हस्ते होणार आहे. रविवार दि.30 नोव्हेंबर, 2025 रोजी ह.भ.प.जयश्रीताई महाराज धाईटी, सोमवार दि. 1 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज मत्रे, मंगळवार दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर, बुधवार दि.3 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.धनश्रीताई महाराज बोर्गे, गुरुवार दि. 4 डिसेंबर, 2025 रोजी ह.भ.प.अचर्नाताई महाराज सुर्यवंषी यांची कीर्तने होणार आहेत. तर शुक्रवार दि.5 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर यांचे काल्याचे किर्तन तसेच गुरुवार दि.4 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ तर सायंकाळ...